upendra
upendra  
पश्चिम महाराष्ट्र

मराठी झेंडा सातासमुद्रापार !!                  

सकाळवृत्तसेवा

मिरज : संगणक क्षेत्रातील मायक्रो प्रोसेसर्स उत्पादनात जागतिक मक्तेदारी असलेल्या अमेरिकेतील "इनटेल इनसाईड ' ( Intel Inside) कंपनीच्या उपाध्यक्षपदी निवड होण्याचा मान मिरजेच्या एका सामान्य कुटुंबातील उपेंद्र मुकुंदराज कुलकर्णी या अभियत्यांस मिळाला. सातासमुद्रापार जाऊन मराठमोळ्या कर्तृत्वाची झलक संगणक क्षेत्रात दाखविणारे कुलकर्णी आणखी एक भारतीय ठरले. कुलकर्णी यांच्या यशाने मिरजेतील त्यांचे कुटुंबीय आनंदाने न्हाऊन निघाले आहेत.

जगातील 85 टक्‍क्‍यांहून अधिक संगणकांची बाजारपेठ ज्या " इनटेल इनसाईड' च्या कंपनीच्या ताब्यात आहे, अशा जगविख्यात कंपनीत 1988 पासून कार्यरत असणाऱ्या कुलकर्णी यांनी अपार कष्टातून मिळवलेले हे उपाध्यक्षपद हे केवळ कुलकर्णी कुटुंबासाठी नव्हे तर सांगली-मिरजकरांसाठी वेगळं अप्रूप आहे.

आतापर्यंत मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञान विषयातील सहा अमेरिकन पेटेंटस्‌ मिळवून संगणक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कुलकर्णी यांच्या संशोधनामुळे मायक्रोप्रोसेसर्स मधील अग्रगण्य कंपनी म्हणून " इनटेल इनसाईड' कंपनीचा दबदबा अद्यापही अबाधित आहे. जगातील पंचवीसहून अधिक देशांमध्ये उत्पादन आणि विक्री व्यवस्था असलेल्या या कंपनीत एक लाखापेक्षा अधिक कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.

हाय परफॉर्मन्स आणि पॉवर ऑप्टीमाईज्ड थ्री डी विंडोजला लागणारे मिडिया आणि डिस्प्ले ड्रायव्हर्स, मॅक - ओएस, अँट्राईंड ऑपरेटिंग सिस्टीम्स, अल्ट्रा बुक टी एम टॅबलेट, आणि स्मार्ट फोन या सर्व उत्पादनांमध्ये कार्यरत असलेल्या जगातील इनटेल कंपनीच्या जगातील सर्व कर्मचाऱ्यांचे नेतृत्व श्री. कुलकर्णी करतात. त्यांनी नुकतीच 32 एन एम सॅंडे ब्रिज आणि 22 एन एम आय व्ही वाय ब्रिज ही प्रोसेसर्स ग्राफिक्‍स या उत्पादनांची नव्याने भर घातली आहे. ग्राफिक्‍स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधअये 9 वर्षे काम करण्यापूर्वीही इनटेलमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. यापैकी सिस्टीम व्हॅलीडेशन, चिपसेटवरील आर्किटेक्‍चर आणि प्रॉडक्‍ट इंजिनिअरिंग ग्राफिक्‍स सीपीयू आणि मॅथ प्रोसेसर्स प्रॉडक्‍ट या संशोधनांवर त्यांनी सलग 15 वर्षे काम केले.

कुलकर्णी यांच्या टीमने जगातील लोकांसाठी दिलेल्या प्रमुख उत्पादनांमध्ये " Intel ( R), Pentium( R) , 4 प्रोसेसर्स लाईन ऑफ सीपीयू, अनेक पीसीआय, एजीपी, चिपसेट आणि 80387 मॅथ को प्रोसेसर यांचा समावेश आहे. याशिवाय संगणक तंत्रज्ञानातील अनेक शोध त्यांनी इनटेल कंपनीच्या माध्यमातून लावले. सध्या इनटेल कंपनीमध्ये उपेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतील भारतातील बंगळूर, दक्षिण कॅरोलिना, मलेशिया, पोलंड, चीन, इस्रायलमधील तेल अव्हिव्ह, येथील चमू कार्यरत आहेत.

'मराठे' व "वालचंद'चा विद्यार्थी...
जागतिक स्तरावरील अमेरिकन कंपनीचे उपाध्यक्षपदाचा मान मिळवणारे उपेंद्र कुलकर्णी यांचे शालेय शिक्षण मिरजेतील बळवंतराव मराठे विद्यालयात, तर अभियांत्रिकीचे शिक्षण सांगलीच्या वालचंद महाविद्यालयात झाले. 1985 मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. अपार कष्टातून उपेंद्रने हे साध्य केलं, अशी प्रतिक्रिया त्यांचे ज्येष्ठ बंधू उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT