crime
crime 
पश्चिम महाराष्ट्र

मोठ्या जावयावर अधिक प्रेम केले जात असल्याने मेव्हण्यावर हल्ला

सकाळवृत्तसेवा

श्रीरामपूर : सासूरवाडीकडून मोठ्या जावयावर अधिक प्रेम केले जात असल्याच्या आकसातून लहान जावयाने मेव्हण्याला रस्त्यात बोलावून त्याच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना बेलापूर-पढेगाव रस्त्यावरील उंबरगाव शिवारात घडली. अशोकनगर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक रqवद्र रमेश वारूळे (वय २६) हे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, डॉ. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक व केशव गोqवद विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश वारूळे (रा. चांदेगाव, ता. राहुरी) यांची मोठी मुलगी शिक्षक मनोहर काळोखे (रा. राहुरी) यांना दिली आहे. तर धाकटी मुलगी मेडिकल व्यावसायिक निलेश ज्ञानदेव मांगुडे ( रा. केंदळ, हल्ली राहुरी) यांना दिलेली आहे. वारुळे कुटुंबिय नेहमी मोठे जावई काळोखे यांच्याकडेच जातात. त्यांच्यावर आपल्यापेक्षा अधिक प्रेम करतात, असा संशय निलेश यांना होता. यापुर्वी त्यांनी काहीवेळा तो बोलूनही दाखविला होता. त्यातूनच ही घटना घडली.

गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास निलेश यांनी आपला मेहुणा रqवद्र रमेश वारुळे यांना फोन करून पेट्रोल संपल्याचे सांगून उंबरगाव येथील कालभैरवनाथ मंदिराजवळ बोलावून घेतले. त्याच्यासोबत आणखी दोघे होते. रqवद्र तेथे पोहचताच निलेश याने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. रqवद्र यांनी प्रसंगावधान साधत हात आडवा घातल्याने ते बचावले. या हल्ल्यात त्यांच्या गळ्यासह हाताच्या बोटांना गंभीर जखमा झाल्या. रqवद्र यांनी प्रतिकार करत तेथून कालभैरवनाथ मंदिराकडे पळ काढला. मंदिराचे पुजारी व उपस्थित भाविकांनी त्यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथे नेले.

घटनेनंतर निलेश मित्रांसह रqवद्रची दुचाकी घेऊन पळून गेला. नंतर तो स्वत:हून बेलापूर पोलिस चौकीत हजर झाला. सासूरवाडीकडून मोठ्या साडूवर अधिक प्रेम केले जात असल्याच्या आकसापोटी आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या इतर दोघांची नावे मात्र समजू शकली नाही. जखमी रविंद्र वारुळे यांच्या पत्नी कल्याणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उच्चशिक्षीत कुटुंबात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT