police
police 
पश्चिम महाराष्ट्र

पाच हजारांची लाच घेताना पोलिस अटकेत

सूर्यकांत नेटके

नगर : पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तात्पुरता अटकपुर्व जामीन घेतल्यावर त्या बाबत न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी पाच घेताना भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील पोलिसाला बुधवारी  (ता. 17) रात्री पाच हजार रूपयांची लाच घेताना पकडले. दिलीप रामकृष्ण तिकोणे असे लाच घेणारया पोलिसांचे नाव आहे. 

नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणारया तक्रार दाराकडे त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यासबंधी न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी तिकोने यांनी दहा हजाराची लाच मागितली होती. त्यातील पाच हजार रूपये घेताना नगरमध्ये जी. पी. ओ. चौकात लाचलुचपत च्या पथकाने रंगेहाथ पकडले.  

नगरमध्ये मंगळवारी  लाचलुचपत विभागाच्या पथकाने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील एका विस्तार अधिकारयाला लाच घेताना पकडल्यावर दुसरया दिवशी पोलिसाला पकडले. लाचलूचपत विभागाच्या सलग दुसरया दिवशीच्या या कारवाईने जिल्हा परिषदेसोबत पोलिस विभागावरही नामुष्कीची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT