school
school 
पश्चिम महाराष्ट्र

इंग्लडच्या पाहुण्यांची नान्नजदुमालास भेट !

हरिभाऊ दिघे

तळेगाव दिघे (नगर) : इंग्लड येथील करुणा ट्रस्टचे केविन कोरेल यांनी नान्नजदुमाला (ता. संगमनेर) येथे शनिवारी भेट दिली.

प्राथमिक शाळेतील उपक्रम, शिक्षण पद्धतीची त्यांनी माहिती घेतली. काकडवाडी येथील छायाचित्रकार दत्तात्रेय घोलप यांच्याकडून केविन यांनी छायाचित्रणाची माहिती घेत चर्चा केली. इंग्लडच्या पाहुण्यांच्या भेटीने सर्वजण भारावून गेले. 

केविन कोरेल हे शनिवारी सकाळी साडेनऊला नान्नजदुमाला येथे आले होते. राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाळंदे, प्रकल्प अधिकारी प्रदीप दारोळे, मंगल कदम, अजित सोर यावेळी उपस्थित होते. छायाचित्रकार दत्तात्रेय घोलप यांच्या स्टुडीओस त्यांनी भेट दिली. ग्रामीण भागातील छायाचित्रण समजून घेत त्यावर चर्चा केली. अल्बम व छायाचित्रे त्यांनी पाहत त्यांनी घोलप यांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली. शाळेतील उपक्रमांची माहिती घेत शिक्षण पद्धती समजून घेतली. केंद्रप्रमुख यशवंत आंबेडकर, मुख्याध्यापिका मीरा देशमुख, कृष्णा मुळे, लतीफ पटेल, अनिता सूर्यवंशी, निर्मला भुजबळ, मीना हासे, किरण ढोकळे उपस्थित होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी इंग्लडच्या पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांची ही भेट संस्मरणीय ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT