Marathi News Pune Pandharpur Road Accident Four wheeler
Marathi News Pune Pandharpur Road Accident Four wheeler 
पश्चिम महाराष्ट्र

कालव्यात क्रुझर कोसळून भीषण अपघात

संदिप कदम

धुळदेव (ता. फलटण) - गावच्या हद्दीतील रावरामोशी पुलाजवळून रात्री एकच्या सुमारास निरा उजवा कालव्यात क्रुझर गाडी गेल्याने झालेल्या अपघातात सात प्रवाशांपैकी सहांना आपला जीव वाचवता आला तर एकजण वाहुन गेल्याचा अंदाज आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री एकच्या सुमारास महाबळेश्वर येथून नांदेड कडे निघालेल्या क्रुझर क्रमांक (एम एच २६ एएफ २८५२) या कामगारांच्या गाडीला विडणी नजीक धुळदेव (ता.फलटण) हद्दीतील रावरामोशी पुलावरुन रस्त्याचा अंदाज न आल्याने कालव्यात कोसळली. यावेळी यामध्ये रामेश्वर पवार (वय २४) प्रफुल्ल राठोड (वय २३), शत्रुध्न चांदेकर (वय २३) तिघे रा. वझरा, ता. माहुर, जि. नांदेड, बालाजी राठोड वय २३, सिद्धार्थ आरके, बंडू, कचरु दत्तु हिरवाडे (रा. दत्तमांजरी, ता. माहुर नांदेड) प्रवास करत होते. अपघातानंतर गाडी कालव्याच्या प्रवारात अडकल्याने व पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गाडीचे दरवाजे उघडणे अशक्य झाले होते. यावेळी गाडीची पुढील व मागील काचा फोडून आपला जीव वाचविण्यात रामेश्वर पवार, प्रफुल्ल राठोड, शत्रुध्न चांदेकर, बालाजी राठोड, सिद्धार्थ आरके व बंडु यांना यश आले. परंतु त्यांचा सहकारी कचरु दत्तु हिरवाडे गाडीत अडकला की बाहेर निघाला याबाबत काहीच माहिती मिळाली नाही. 

अपघाताची माहिती मिळताच आरोग्य सेवेसह पोलिस यंत्रणेने तत्परतेने घटनास्थळी धाव घेवून वेळेत मदत उपल्बध करुन दिल्याने अपघातग्रस्तांना दिलासा मिळाला. तर स्थानिक रहिवासी बाळासाहेब ननावरे यांनी प्राथमिक मदत पुरवली. सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी बाहेर काढण्यात क्रेन चालकास यश मिळालेले. तर आपला मित्र हरविल्याची चिंता यावेळी अपघातातून बचावलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT