Marathi news Sangli latest news Devendra Fadnavis Hutatma Sugar
Marathi news Sangli latest news Devendra Fadnavis Hutatma Sugar 
पश्चिम महाराष्ट्र

आघाडीच्या नेत्यांना पापाचे मोल चुकवावे लागेल : देवेंद्र फडणवीस

सकाळवृत्तसेवा

सांगली : हुतात्मा कारखान्याला यापूर्वी इथेनॉल प्रकल्प मंजूर केला; मंजूर झालेला प्रकल्प पुन्हा रद्द करण्याचे पाप मागील आघाडी सरकारच्या काळात झाले. परंतू या पापाचे मोल संबंधितांना चुकवावेच लागेल असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळवा येथील कार्यक्रमात विरोधकांना दिला. 

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. 

श्री.फडणवीस म्हणाले, हुतात्मा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला देशात सर्वाधिक दर देण्याचा विक्रम नोंदवला आहे. सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करून क्रांतिवीर नागनाथअण्णांनी शेतकऱ्यांसाठी कारखाना उभा केला आहे. कारखान्याने इथेनॉल प्रकल्पासाठी परवानगी यापूर्वी मागितली होती. त्यांना मंजुरी मिळाली, परत ती रद्द केली. वास्तविक क्रांतिवीर नागनाथअण्णा आणि हुतात्मा किसन अहिर यासारख्या देशभक्तांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या कारखान्यात थोडीसी जरी त्रुटी असली तरी इथेनॉल प्रकल्प मंजूर करायचा पाहिजे. परंतू कोणतीही त्रुटी नसताना इथेनॉल प्रकल्प मंजूर झाल्यानंतरही तो रद्द करण्याचे पाप केले. परंतू ज्यांनी हे पाप केले त्यांना त्याचे मोल चुकवावेच लागेल असा सूचक इशारा दिला.

"पतंगरावांचा सल्ला घेतला असता प्रकल्प रद्द झालाच नसता' 
व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांच्याकडे पाहत वैभवकाका नायकवडींना उद्देशून म्हणाले, "पतंगरावांचा सल्ला घेतला असता प्रकल्प रद्द झालाच नसता'.

ते पुढे म्हणाले, वैभवकाका आता काळजीचे कारण नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे. जेवढे प्रकल्प करायचे असतील तेवढे करा, सरकार ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहिल. तुम्ही आमच्या सोबत आला किंवा नाही आलात तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT