accident
accident 
पश्चिम महाराष्ट्र

खांबाटकी बोगद्याजवळ चार वाहनांचा अपघात; 13 जखमी 

सकाळवृत्तसेवा

खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर खांबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यानंतर लक्झरी बसला पाठीमागुन भरधाव येणाऱ्या दूध टँकरने जोरदार धडक दिल्याने बस पुढील ट्रकवर आदळली . हा ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला . या अपघातात नागपुरहुन सहलीसाठी आलेले 12 विद्यार्थी व बस आणि टॅकरचालक जखमी झाले . एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ पुणे येथे हलवण्यात आले . 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी की, बुधवार दि .29 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खांबाटकी बोगदा ते धोम -बलकवडी कालव्याच्या मध्ये महामार्गावर चार वाहनांचा अपघात झाला. खांबाटकी बोगदा ओलांडून पुणे बाजूकडे जाताना उतारावर काही वाहने थांबली होती. समोर वाहने थांबल्याने लक्झरी बसचालकाने बस थांबवली. त्याचवेळी पाठीमागुन भरधाव वेगात आलेला दूध टँकर ब्रेक न लागल्याने बसच्या पाठीमागील बाजूवर आदळून डाव्या बाजूच्या कठडयास धडकला. टँकरच्या जोरदार धडकेने बस पुढे उभ्या असलेल्या कोंबडया भरलेल्या ट्रकवर आदळली . त्यामुळे ट्रक दुसऱ्या ट्रकला धडकला. या अपघातामुळे रस्त्यावर काचा , बसमधील विद्यार्थ्यांच्या बॅगा, वस्तू विखूरल्या गेल्याने आणी दोन्ही वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेल्याने वाहतुक ठप्प झाली. 

घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस ठाण्याच्या सपोनि स्मीता पाटील, सपोनि मोहन कदम, शिरवळचे सपोनि सुनिल पवार, पो. हवालदार अमोल मर्ढेकर, विजय पिसाळ, भोईटे, यादव, मुठे आदी घटनास्थळी हजर झाले. जखमी विद्यार्थ्याना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रस्त्यावर विखुरलेल्या काचा व इतर साहित्य बाजूला काढून रस्ता खुला केला. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. 

अपघातातील जखमी :
1 ) भाविक अशोक बांते , ओम नगर सकरदरा नागपूर ( 15 वर्ष ) गंभीर जखमी 
2 )कार्तिक किशोर ठाकरे ( 15 वर्ष )
3 )आनिक्षा विजय घायवाट ( 20वर्ष )
4 )संगिता गजानन पारतवार (60वर्ष ) 
5 )कमलाबाई तोलाराम सुतोणी      (65वर्ष ) 
6 )अग्नी अनिल राऊत ( 20 वर्ष ) 
7 )देवेंद्र रमेश चौधरी ( 21 वर्ष ) 
8 ) चुन्नाराम सलामी ( 28 ) मध्यप्रदेश       क्लीनर बस 
9 ) मयुरी काशीनाथ लोनगाडगे (2O)
10 )प्रणय अरुण शिवणकर (15 )
11 ) हर्षल लीलाधर बांते (15 )
12 ) रागीनी विनोद देवडे ( 20 वर्ष )
13 ) सतिश सुभाष शेटे (32 वर्ष )नवे पारगांव , हातकणंगले कोल्हापूर टॅंकर ड्रायव्हर 
14 ) बाळकृष्ण रामनरेश विश्वकर्मा (49 वर्ष ) बसचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT