NCP
NCP 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा कार्यक्रमावर बहिष्कार

सकाळवृत्तसेवा

सातारा - खासदार उदयनराजे भोसलेंबाबत राष्ट्रवादी काँग्रसच्या आमदारांमध्ये असलेल्या नाराजीने आज जाहीर बंडाची भूमिका घेतली. पक्षाध्यक्ष शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत कार्यक्रमाला कोणीही येणार नाही, असा पवित्रा पक्षाच्या सर्व आमदारांनी घेतला. ‘तुम्हीही जाऊ नका’, असा सर्वांचा त्यांनाही आग्रह होता. शेवटी पक्षाच्या आमदारांशिवाय शरद पवारांना व्यासपीठावर यावे लागले. भाजप व शिवसेनेचे मंत्री व आमदारांच्या गराड्यात बसावे लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपून राहिली नाही.

खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये पूर्वीपासून मतभेद आहेत. गेल्या वर्षभरात ते वाढतच गेले आहेत. त्याचा परिणाम उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात होण्याची शक्‍यता होती. घडलेही तसेच. सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांना बारामतीला भेटीची वेळ मागितली होती; पण २४ तारखेला पाच वाजता कार्यक्रम आहे, आपण साताऱ्यात बोलू, असे त्यांनी सांगितले होते. आज दुपारी तीन वाजता श्री. पवार साताऱ्यात आले.

महामार्गालगतच्या ‘प्रीती’ हॉटेलवर त्यांचे सरचिटणीस राजकुमार पाटील व निवास शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर माजी आमदार प्रभाकर घार्गे आले. त्यांनी काही विषय सांगितले. नंतर खासदार उदयनराजे आले. त्यांनी श्री. पवार यांचे स्वागत केले आणि निघून गेले. 

उदयनराजे गेल्यानंतर खऱ्या बैठकीला सुरवात झाली. रामराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण तेथे आले होत. शरद पवारांसोबत या सर्वांची तब्बल एक तास दहा मिनिटे बैठक झाली. पवारांनी रामराजे, शिवेंद्रराजेंची मते जाणून घेतली. सर्वांनी ठामपणे ‘आम्ही कार्यक्रमास येणार नाही,’ असे त्यांना सांगितले.

‘तुम्हीही जाऊ नये’ अशी अपेक्षाही व्यक्ती केली. पवारांनी सर्वांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही तयार झाले नाही. शेवटी तुम्ही कार्यक्रमास जावे, असे सर्वांनी सांगितले. बैठक संपत आली असताना उदयनराजे पुन्हा हॉटेलवर आले. ते बैठक सुरू असलेल्या खोलीत गेले. त्यानंतर चर्चा होऊन थोड्या वेळाने श्री. पवार व उदयनराजे कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यानंतरही काही काळ रामराजेंसह सर्व आमदार थांबले होते. आमदारांच्या पवित्र्यामुळे बालेकिल्ल्यात शरद पवारांना आपल्याच खासदाराच्या कार्यक्रमात युती शासनाचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांच्या गराड्यात बसावे लागले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपून राहिली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT