Marathi News Solapur Savargaon 'Jalsanvardhak' Award
Marathi News Solapur Savargaon 'Jalsanvardhak' Award 
पश्चिम महाराष्ट्र

सावरगावास जलसंवर्धक पुरस्कार जाहीर 

बाबासाहेब शिंदे

पांगरी (जि.सोलापूर) - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल सावरगाव (ता.बार्शी) या गावास जलसंवर्धक पुरस्कार प्राप्त झाला आहे. नाशिकमध्ये येत्या 26 नोव्हेंबर पार पडणाऱ्या कृषीथॉन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

ह्युमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यामाने नाशिक येथे कृषीथॉन आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या 12 व्या आवृतीचे आयोजन येत्या 23 ते 27 नोव्हेंबर या कालवधीत पार पडणार आहे.

जलसंधारण अभावी शेती व जमिनी उजाड होत चालली आहे. हे विदारक चित्र ओळखून सावरगाव येथील ग्रामस्थांनी जलसंधारणाचे महत्व ओळखून एकजुटीने त्याबाबतीत कामे हाती घेतली. त्यावेळी गावांतील अनेक व्यक्तींनी मदत करून गाव जलसंधारणाचा उपक्रम यशस्वीपणे पुर्ण केला. शिवारात पडलेला पाऊसाचा थेंब अन् थेंब साठवून जिरवण्याचा आटोकाट प्रयत्न ग्रामस्थांनी केला आहे. या उल्लेखनीय कामाबद्दल सावरगावाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते नाशिक येथे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT