पश्चिम महाराष्ट्र

कुस्तीमध्ये जिंकला.. आणि पराभूत पैलवानाच्या पायाही पडला!

वसंत कांबळे

कुर्डु (जि. सोलापूर) : बलदंड शरीरं,  झटापट, धोबीपछाड, आदळ-आपट आणि डावपेच असे सर्व प्रकार एकाच खेळात पाहायला मिळतात, तो खेळ म्हणजे कुस्ती.

एकमेकांविरोधात त्वेषाने लढून, समोरच्या पैलवानाला चीतपट करण्याचा प्रयत्न प्रत्येक मल्लाकडून होत असतो. मात्र याच कुस्तीने एक अनोखंपण जपलं आहे. ते म्हणजे कुस्तीतील खिलाडूवृत्ती आणि वरिष्ठ खेळाडूला दिलेला सन्मान. कुस्तीतील हीच खिलाडूवृत्ती आज महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या स्पर्धा भोगाव जिल्हा पुणे येथे स्पर्धेत पाहायला मिळाला 

वयाच्या पस्तीशीत पोहोचलेला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरला. चंद्रहारच्या खजिन्यात 2007 आणि 2008 सालच्या महाराष्ट्र केसरीची गदा आहे. त्यानंतर कामगिरीतला चढउतार आणि बळावलेली दुखापत यामुळं चंद्रहारला महाराष्ट्र केसरी जिंकता आला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दुखापतींमुळे कुस्तीच्या आखाड्यातून दूर असलेला चंद्रहार महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरला. मात्र पहिल्याच फेरीत चंद्रहारला खूपच ज्युनिअर मूळचा कुर्डु येथील असलेला पण हिंगोलीचे कुस्तीचे नेतृत्व करणाऱ्या गणेश जगतापने चीतपट केलं.

क्रिकेटसारख्या खेळात मोठ्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर, नवखे गोलंदाज कसा आनंद साजरा करतात, हे आपण पाहिलं आहे. तसंच कुस्तीत चंद्रहारसारख्या बलाढ्य पैलवानाला चीतपट केल्यानंतर कोणत्याही ज्युनिअर मल्लाने जल्लोष साजरा केला असता. मात्र कुस्ती हा खेळच वेगळा आहे. विजेता पैलवान गणेश जगताप सामना जिंकल्या जिंकल्या थेट चंद्रहार पाटीलच्या पाया पडला. चंद्रहार हा डबल महाराष्ट्र केसरी विजेता आहे. कुस्ती या खेळासाठी त्याच्यासारख्या पैलवानांचं योगदान मोठं आहे.या खेळासाठी आणि वरिष्ठ खेळाडूचा मान राखण्यासाठी गणेश जगतापने थेट चंद्रहारचे आशीर्वाद घेतले. गणेश जगतापने स्वत: पराभूत केलेल्या पैलवानेचे आशीर्वाद घेतल्याने उपस्थित शौकिनांनी त्याचं कौतुक केलं. गणेशने कुस्ती तर जिंकलीच, शिवाय मनंही जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT