Marathi Sahitya Sammelan Progressive convention success Decision preparatory meeting  sakal
पश्चिम महाराष्ट्र

‘प्रगतिशील’चे संमेलन यशस्वी करणार

पूर्वतयारी बैठकीत निर्धार : साहित्यनगरीला एन. डी. पाटील यांचे नाव

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : प्रगतिशील लेखक संघातर्फे आयोजित पहिले मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार शुक्रवारी (ता. १५) गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या पूर्वतयारी बैठकीत घेण्यात आला. यावेळी काही महत्वाचे निर्णयही घेण्यात आले. संघाचे अध्यक्ष आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते.

कार्यवाह कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले. संमेलन २३ व २४ एप्रिलला मराठी विद्यानिकेतन शाळेच्या प्रांगणातील दिवंगत भाई एन. डी. पाटील नगरीत ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. भाई एन. डी. पाटील यांनी अख्खे जीवन वंचितांसाठी वेचले. सीमाप्रश्‍नासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साहित्यनगरीला त्यांचे नाव दिले आहे, अशी माहिती देण्यात आली. प्रख्यात गीतकार साहिर लुधियानवी यांची यंदा जन्मशताब्दी आहे.

यामुळे सभामंचाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्‍यात आला. दिवंगत शिक्षणप्रेमी शंकर पाटील यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्याचे ठरले. यावेळी प्रा. दत्ता नाडगौडा, ॲड. नागेश सातेरी, सदानंद सामंत, व्ही. एस. बिदनाळ, अनिल आजगावकर, मधू पाटील, विलास ताशिलदार, अर्जुन सांगावकर, प्रा. मयूर नागेनट्टी, कला सातेरी, लता पावशे, प्रभावती शहापूरकर, स्नेहल शहापूरकर, रोशनी हुंदरे, गायत्री गोडबोले, शामल तुडयेकर, दीपिका जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सहकार्यवाह अशोक आलगोंडी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT