Marriage
Marriage 
पश्चिम महाराष्ट्र

ज्यांनी घटस्फोट मिळवून दिला, त्यांनीच लावून दिले लग्न! 

परशुराम कोकणे

सोलापूर : घटस्फोट हा शब्द तसा नकारार्थीच.. रोज न्यायालयात कोणाचा ना कोणाचा तरी घटस्फोट होतच असतो, पण घटस्फोट आणि लग्न हे दोन्ही एकाच वकिलांनी करून देणे तसे दुर्मिळच. ऍड. मंजुनाथ कक्कळमेली यांच्या पुढाकारामुळे एका घटस्फोटित मुलीचा पुनर्विवाह झाला. 

प्रेरणा ही आपल्या पतीच्या जाचामुळे खूपच त्रस्त होती. एकुलती एक मुलगी. वयाने लहान असल्याने मुलीचे थाटात लग्न करून दिले होते. मुलीला हवं ते सगळं दिलं होतं. जावई मुलीला नीट नांदवत नसल्याने आई, वडीलही खूपच त्रस्त होते. मुलीला घटस्फोट मिळावा म्हणून आई-वडील ऍड. मंजुनाथ कक्कळमेली यांच्याकडे आले. सर्व विचारविनिमय झाल्यानंतर पती व त्याच्या घरच्यांना बोलावून घेतले. वेगळे होण्यातच दोघांचे भले आहे अशी चर्चा होऊन सामंजस्याने घटस्फोट घ्यायचे ठरविले. ऍड. कक्कळमेली यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. दोघांचे घटस्फोट न्यायालयाकडून मंजूर करून घेतले. 

जाता- जाता ऍड. कक्कळमेली यांनी मुलीचे वय लहान असल्याने पुनर्विवाह व शिक्षणाचा विचार सुचविला. त्या अनुषंगाने मुलीच्या पुनर्विवाहासाठी आई-वडील स्थळ पाहत होते. योगा-योगाने गावातल्याच आनंद नावाच्या मुलाचे स्थळ चालून आले. तो मुलगाही घटस्फोटित आणि एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्‌द्‌यावर कामाला होता. सर्वांनी विचार करून मुलीचे लग्न करायचे ठरविले, परंतु अगोदरच एक धक्का बसला असल्याने मुलीचे आई-वडील व मध्यस्तांनी आधी वकिलांचा सल्ला घेतला. 

मुलीचे आई-वडील परत ऍड. कक्कळमेली यांच्याकडे आले. त्यांनी मुलाच्या घटस्फोटाच्या निकालपत्राची व मुलाच्या नोकरीची शहानिशा करून नोंदणी विवाह करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सोलापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कुटुंबीयांच्या उपस्थितीत प्रेरणा व आनंद यांचा पुनर्विवाह झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT