Sangli Crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : विवाहितेनं दोन मुलांसह विहिरीत उडी टाकून संपवलं जीवन; काठावर घागर, चप्पल आढळली अन्..

Sangli Crime : भिवर्गी (ता. जत) येथे विवाहितीने दोन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली.

सकाळ डिजिटल टीम

जत पूर्व भागातील भिवर्गी येथील बिळ्यानसिद्ध मंदिराच्यामागे धर्मराय साताप्पा बिराजदार आई, वडील, पत्नी, मुलांसमवेत राहतात.

संख : भिवर्गी (ता. जत) येथे विवाहितीने दोन मुलांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. राजाक्का धर्मराय बिराजदार (वय २८), मुलगा विष्णू धर्मराय बिराजदार (वय ५), माधुरी धर्मराय बिराजदार (वय २) अशी तिघांची नावे आहेत. ही घटना दुपारी ३ वाजता पांडोझरी ओढ्यावरील विहिरीत घडली. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

पोलिसांकडून (Umadi Police Station) मिळालेली माहिती अशी, जत पूर्व भागातील भिवर्गी येथील बिळ्यानसिद्ध मंदिराच्यामागे धर्मराय साताप्पा बिराजदार आई, वडील, पत्नी, मुलांसमवेत राहतात. गावात धर्मराय बिराजदार यांचे दूध संकलन केंद्र आहे. घरातून शनिवारी दुपारी राजाक्का पाणी आणण्यास घागर घेऊन गेली होती. मुलगा विष्णू, मुलगी माधुरी सोबत होते. घरात मुले नसल्याने शोधाशोध केली, मात्र आढळली नाहीत. शेजारी, नातेवाइकांकडेही चौकशी केली असता ती सापडली नाहीत.

दरम्यान, काही वेळाने ग्रामस्थांना ओढ्याजवळील सिद्धू करे यांच्या विहिरीच्या काठावर घागर, चप्पल आढळली. त्यामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचा संशय बळावला. घटनेची माहिती पोलिसपाटील श्रीशैल चौगुले यांनी उमदी पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यान, विहिरीतून पाण्याचा उपसा सुरू केला; परंतु ओढ्याला पाणी असल्याने पाणी निघाले नाही. मृतदेह शोधण्यास अडथळा येत होता. अखेर सांगोला येथील रेसक्यू पथकाला पाचारण केले. रेसक्यू टीमने काल दुपारी एक वाजता मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. जत येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांची उत्तरणीय तपासणी करून नातेवाइकांच्या ताब्यात दिले. अधिक तपास सहायक निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT