the meeting of education department and vice chairman meeting in belgaum for results of last year exams 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनामुळे रद्द झालेल्या परीक्षांच्या निकालाचे चित्र लवकरच होणार स्पष्ट

सतीश जाधव

बेळगाव : कोरोनामुळे अंतीम वर्षाच्या परीक्षा वगळता पदवी आणि पदव्यूत्तरच्या इतर परिक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परीक्षा रद्द होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी  यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे  विद्यार्थी बुचकळ्यात सापडले आहेत. यासंबंधी सोमवारी उच्च शिक्षण खाते व कुलगुरुंची बंगळूर येथे बैठक होणार आहे. त्यानंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

यंदा मार्च महिन्यांपासून कोरोनामुळे महाविद्यालये बंदच होती. 17 नाव्हेंबरपासून महाविद्यालये सुरु झाली. दरवर्षी मात्र, मार्च व जुन दरम्यान होणाऱ्या महाविद्यालयाच्या परीक्षा रद्दच झाल्या होत्या. सप्टेंबर दरम्यान फक्त अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यांचा निकाल अवघ्या महिनाभरात लावण्यात आला. मात्र, ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यांचा निकाल लावण्यात आला नसल्याने विद्यार्थीही बुचकळ्यात सापडले आहेत. यासंबंधी विद्यापीठ किंवा संबंधीत महाविद्यालयात विचारणा केली असता, लवकरच निकाल दिला जाईल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांना दिली जात आहे.

पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या तसेच पदव्यूत्तरच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी संबंधीत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियाही सप्टेंबर महिन्यातच पूर्ण झाली आहे. 17 नोव्हेंबरपासून महाविद्यालये देखील सुरु झाली आहेत. मात्र, कोरोना चाचणी व पालकांचे संमतीपत्र आवश्‍यक असल्याने महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अत्यंत कमी हजेरी दिसून येत आहे. यामुळे अजूनही ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. 

पदवी आणि पदव्यूत्तरच्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यांचा निकाल कोणत्या आधारावर लावण्यात येणार आहे. याचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या 80 लेखी परीक्षा 20 प्रॅक्‍टिकल स्वरुपातील परीक्षा घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्‍टिकलमधील 20 पैकी जितके गुण पडले आहेत. त्या आधारावर अंतीम गुण दिले जाणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र, सोमवारच्या बैठकीनंतर अंतीम चित्र स्पष्ट होणार आहे.

"पदवी व पदव्यूत्तरच्या ज्या परीक्षा कोरोना काळात रद्द झाल्या आहेत. त्याबाबत निकालासंदर्भात पत्र लिहून माहिती मागविली होती. मात्र, सोमवारी बंगळूर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे."

- डॉ. रामचंद्रगौडा, कुलगुरु, राणी चन्नमा विद्यापीठ

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT