पश्चिम महाराष्ट्र

पुसेगावात 'यासाठी' एकवटले ग्रामस्थ

सकाळ वृत्तसेवा

खटाव (जि. सातारा) : अलीकडच्या काळामध्ये पुसेगावचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार प्रचंड प्रमाणात होत आहे. त्याबरोबर सध्या तयार होत असलेल्या महामार्गाच्या निमित्ताने पुसेगावचा चेहरामोहरा बदलणार आहे. तेव्हा गावातून रस्ता होण्यापूर्वी गावच्या पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले. 

पुसेगाव (ता. खटाव) गावाचा सर्वांगीण विकास आराखडा तयार करण्यासाठी नारायणगिरी सभागृहात माजी आयुक्त श्री. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात श्री. दळवी बोलत होते. यावेळी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, रणधीर जाधव, सुनील जाधव, शिवाजीराव जाधव, गुलाबराव वाघ, संतोष तारळकर, जगनशेठ जाधव, संतोष साळुंखे, प्रकाश जाधव, संजय जाधव, डॉ. विवेक जाधव, प्रदीप जाधव, सुश्रुत जाधव, भरत मुळे, ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
हेही वाचा - पाटण तालुक्यात चोरट्यांनी फाेडली सात दुकाने

श्री सेवागिरी महाराज हे केवळ पुसेगावकरांचेच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीचे श्रध्दास्थान आहे. या सुवर्णनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील विविध राजकीय संघटना, शेतकरी, महिला, युवक, बचत गट, अनुसूचित जाती-जमाती, अशासकीय स्वयंसेवी संस्था, संघटना, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यात समाविष्ट करून त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचा सल्ला देवून श्री. दळवी यांनी शासनाचा 14 वा वित्त आयोग निधी कसा मिळवायचा, त्याचा विनियोग नेमका कशा पध्दतीने करावयाचा, याबद्दल मार्गदर्शन केले. गरज पडली तर सर्व घटकांमधील एका-एका प्रतिनिधींचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन याकामी त्यांचे सहकार्य घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. 

हेही वाचा - व्‍वा... शेखर सिंहांचा पहिल्‍याच दिवशी धडाका

देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव जाधव यांनी आठवडा बाजारासाठी लागणारी प्रशस्त जागा व पाणंद रस्ता दुरुस्ती, डॉ. सुरेश जाधव यांनी सर्व रस्ते मुख्य रस्त्यांना जोडणे, जिहे-कटापूर योजनेद्वारे परिसरातील सर्व शेतीला पाणी उपलब्ध होईल असे नियोजन, मुख्य महामार्गालगत बंदिस्त गटारे, गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी व देवस्थानला आवश्‍यक असणारी वीज शासनामार्फत सौरऊर्जेच्या साह्याने उपलब्ध व्हावी अशी सूचना मांडली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी प्रभागनिहाय स्वच्छता आणि शौचालये, गावातून होणाऱ्या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, युवकांना रोजगार निर्मितीचे मुद्दे उपस्थित केले. विश्वस्त सुरेश जाधव यांनी पुसेगावच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकवस्तीवर रस्त्यांची सोय आणि बस स्थानकावर शौचालयाची सोय करणे हे मुद्दे मांडले. विश्वस्त योगेश देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, वंचित घटकांसाठी लग्नादी शुभकार्यासाठी सभागृहाची सोय करून देणे हे मुद्दे मांडले. 

हेही वाचा - प्राथमिक शिक्षकांना बीएलओची सक्ती नको

याव्यतिरिक्त गावची पाणीपुरवठा योजना, सांडपाण्याचा रिसायकलिंगद्वारे उपयोग, अतिक्रमणे हटवणे, पुसेगाव बस स्थानक, मुलांसाठी स्विमिंग टॅंक, स्पोर्टस्‌ सुविधा, वाढीव गावठाणाची सिटी सर्व्हेला रितसर नोंद, पुसेगावात कांदा, बटाटा व आले बाजारपेठ म्हणून सर्वतोपरी सुविधा मिळणे आदी मुद्दे यावेळी मान्यवरांनी उपस्थित केले. या बाबत लवकरच पुढील बैठक घेण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. सातारा सातारा सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT