पश्चिम महाराष्ट्र

खंडपीठ जागेबाबत सोमवारी पुण्यात बैठक

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या जागेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खंडपीठ कृती समितीला सोमवारी (ता. १६) पुण्यात चर्चेसाठी निमंत्रण दिले. त्यामुळे सर्किट बेंचच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या.

सर्किट बेंचसाठी शेंडापार्क येथील जागा द्यावी, यासाठी बार असोसिएशनसह खंडपीठ कृती समितीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आज डॉ. म्हैसेकर यांची जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांना ॲड. चिटणीस यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथील मध्यवर्ती ठिकाणी सर्किट बेंच होणे गरजेचे आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्किट बेंचसाठी शेंडा पार्कातील ७५ एकर जागा निश्‍चित व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या वेळी त्यांनी ती जागा देण्याचे जाहीर करून त्या जागेवर आरक्षण टाकण्याचे आणि १०० कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे ती जागा सर्किट बेंचसाठी आरक्षित करावी, अशी मागणी केली.

शिष्टमंडळात बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. आनंदराव जाधव, सचिव ॲड. सुशांत गुडाळकर, 
सदस्य ॲड. अभिषेक देवरे आदींचा समावेश होता.

खंडपीठाच्या प्रस्तावित जागेबाबत चर्चेसाठी डॉ. म्हैसेकर यांनी सोमवारी कृती समितीला पुण्याला बोलवले आहे. चर्चेत शेंडा पार्कातील जागेसंबंधीच्या तांत्रिक अडचणी कोणत्या आहेत, याची माहिती घेऊन त्या तातडीने सोडवून जागा आरक्षित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी पाठवू, असे आश्‍वासनही डॉ. म्हैसेकर यांनी दिले आहे.
- ॲड. प्रशांत चिटणीस, अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT