Ahmednagar muncipale corporation 
पश्चिम महाराष्ट्र

स्थायी समितीचे सदस्य लग्नाला, कोण येईल सभेला.. करा कॅन्सल

अमित आवारी

नगर ः महापालिका प्रशासनाला आज स्थायी समितीची सभा रद्द करावी लागली. आरोप-प्रत्यारोप किंवा गोंधळामुळे नव्हे, तर त्यासाठीचे कारणही मजेशीर होते. "स्थायी'चे बहुतांश सदस्य लग्न सोहळ्यांमध्ये रमले होते. सभेसाठी फक्त सभापती मुदस्सर शेख व नगरसेविका सुवर्णा जाधव, असे दोघेच हजर होते. सदस्यच उपस्थित नसल्याने शेख यांनी आजची सभा स्थगित करीत असल्याची घोषणा केली. 

स्थायी समितीतील 16 पैकी आठ सदस्य काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले आहेत. मात्र, त्यांच्या निवृत्तीच्या व नवीन सदस्य निवडीच्या फाइलवर सभापती शेख यांनी स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे आम्हाला स्थायीच्या सभेत बसू देण्याची मागणी निवृत्त सदस्यांनी केली आहे.

म्हणून कॅन्सल 
दरम्यान, महापालिकेत आज दुपारी एक वाजता "स्थायी'ची सभा होणार होती. आठवड्यापूर्वी सभेतील विषय निश्‍चित झाले होते. त्याची माहितीही सभासदांना दिली होती. प्रशासनानेही सभेची तयारी पूर्ण केली. बरोबर दुपारी एक वाजता बहुतांश विभागांचे प्रमुख महत्त्वाच्या फायलींसह "स्थायी'च्या सभागृहात येऊन बसले. सव्वा एक वाजेपर्यंत कोणीच आले नव्हते. त्यानंतर लगबगीने सभापती शेख सभागृहात आले. त्यांनी खुर्चीवर बसताच, विवाह समारंभात सदस्य व्यस्त असल्याने आजची सभा स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले. सुरवातीला अधिकाऱ्यांनाही त्यावर विश्‍वास बसत नव्हता. त्याच वेळी नगरसेविका जाधव यांचे सभागृहात आगमन झाले. मात्र, सभाच स्थगित झाल्याचे ऐकून त्यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला.

यांचं असं, त्यांचं तसं.. 

"स्थायी'त सध्या आठ सदस्य आहेत. सभेसाठी किमान पाच सदस्य हजर असणे आवश्‍यक होते. शिवसेनेचे सुभाष लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल आहे, तर शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणाबाबत चौकशीचा आदेश निघत नाही, तोपर्यंत महापालिकेत पायही ठेवणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाच केली आहे. त्यामुळे हे दोघे येणार नसल्याचे आधीच स्पष्ट होते. "राष्ट्रवादी'चे कुमार वाकळे यांच्या घरी विवाह समारंभ होता, तर "राष्ट्रवादी'च्याच गणेश भोसले हे नात्यातील एका विवाह सोहळ्यासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे हे दोघे सभेला हजर राहू शकले नाहीत. भाजपच्या आशा कराळे याही शहरातील एका लग्न सोहळ्यात व्यस्त असल्याने उशिरा येणार होत्या. भाजपच्याच सोनाली चितळे यांच्या घरी धार्मिक विधी असल्याने त्या आल्या नाहीत, असे सभापती शेख यांनी स्पष्ट केले. 

"ते' अधिकारीही गैरहजर 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निनावी पत्र पाठवून महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यावर आरोप केला होता. ते अधिकारी आज स्थायी समितीच्या सभेलाही अनुपस्थित होते. त्यामुळे महापालिकेत उलट-सुलट चर्चा रंगली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT