three arrested in mephedrone drugs case sakal
पश्चिम महाराष्ट्र

Drugs Seized : 'एमडी'चे पुणे कनेक्शन कुपवाडपर्यंत; तीनशे कोटींचा ड्रग्ज साठा जप्त, तिघांना अटक

पुण्यात अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटची पाळेमुळे आता सांगलीपर्यंत येऊन पोहोचली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सांगली/कुपवाड - पुण्यात अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटची पाळेमुळे आता सांगलीपर्यंत येऊन पोहोचली आहेत. कुपवाड येथील ड्रग्जसाठ्यावर पुणे क्राईम ब्रँच आणि सांगली पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापेमारी केली. याठिकाणी पोलिसांनी तब्बल १४० किलो एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. याची बाजारभावाप्रमाणे २८० ते तीनशे कोटी रुपये एवढी किंमत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आयुब अकबरशा मकानदार (वय ४४, रा. बाळकृष्णनगर, कुपवाड) याच्यासह रमजान हमीद मुजावर (वय ५५, रा. नुरइस्लाम मश्जिदजवळ, कुपवाड), अक्षय चंद्रकांत तावडे (वय ३०, रा.बाळकृष्णनगर, कुपवाड) या संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अजूनही कारवाई सुरू असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी दिली. यावेळी मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा व कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील उपस्थित होते.

अधिक माहिती अशी की, पुणे पोलिसांनी पुण्यात १९ फेब्रुवारी कारवाई केली होती. पुण्यातील एकाकडे पावणे दोन किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यानंतर पुण्यातील क्राईम ब्रँचने सखोल चौकशी केली. संशयिकाडून सांगलीतील काही नावे समोर आली. त्याअनुषंगाने खात्री करण्यात आली.

अंमली पदार्थाचे धागेदोरे कुपवाडपर्यंत असल्याची खात्री झाल्यानंतर आज पुणे क्राईम ब्रँचचे पथक दाखल झाले. कुपवाड शहरातील स्वामी मळा परिसरात छापा टाकून कारवाई केली. या कारवाईमध्ये १४० किलो ‘एमडी’ ड्रगसाठा जप्त करण्यात आला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावातील किंमत जवळजवळ २८० ते ३०० कोटीपर्यंत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, आज कुपवाड परिसरात पुणे क्राईम ब्रँचची छापेमारी सुरू असल्याची बातमी वाऱ्या सारखी पसरली. पोलिसांनी मोठी गोपनीयता कारवाईत पाळली होती. रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती.

खोलीला घातले कुलूप

स्वामी मळा परिसरात ज्याठिकाणी ड्रग्जचा साठा होता त्याठिकाणी पोलिसांनी छापा मारला. त्याठिकाणी पोलिसांनी गोपनीयता ठेण्यासाठी खोलीला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. खोलीच्या आतामध्ये तब्बल चार तास चौकशी सुरू होती. त्यामुळे परिसरात एकच चर्चा होती.

स्वामी मळ्यात भाड्याची खोली

संशयित आयुब मकानदार याने महिन्यापूर्वीच स्वामी मळा परीसरात एक भाड्याने खोली घेतली होती. संशयीत आरोपी हा नुकताच ड्रग तस्करी प्रकरणी येरवडा कारागृहात सात वर्ष होता. तो सन २०२३ मध्ये जमनीवर बाहेर आला होता. जेलमधे त्याची ड्रग माफियाबरोबर ओळख झाली होती. या साखळीतून त्याची ओळख होऊन त्याने हा साठा शहरांतील भाड्याची खोलीत ठेवला असल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.

संशयित माजी सचिव

संशयित आयुब मकानदार याच्यावर ड्रग्ज प्रकरणात सन २०१५ मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी तो कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्सचा सचिव म्हणून कार्यरत होता. ड्रग्ज प्रकरणात त्याचा सहभाग आल्याने खळबळ उडाली होती. आता पुन्हा त्याचे नाव आल्याने सर्वत्र चर्चा होती.

सन २०११ मध्ये मोठी कारवाई

कुपवाडमध्ये यापुर्वी सन २०११ मध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. कामूद ड्रग्ज कंपनीने परवानगीचे उल्लंघन करून केटामाईनचे उत्पादन केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी कंपनीचे संचालकसह इतरांची चौकशी करण्यात आली होती. त्यापैकी काही जण अद्यापही कारागृहात आहेत.

त्यानंतर ड्रग्ज प्रकरणाची खळबळ कुपवाडमध्ये सुरू झाली. त्यानंतर आयुब याचे नाव दहा वर्षापुर्वी पुढे आले होते. आता पुन्हा ड्रग्ज समोर आले आहे. यातील मार्टरमाईंटपर्यंत पोहचणे पोलिसांसाठी आव्हान असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT