arben banks closed 
पश्चिम महाराष्ट्र

धक्‍कादायक...राज्यातील 51 नागरी बॅंकांचे विलीनीकरण

तात्या लांडगे

सोलापूर : लेवल टास्क फोर्स फॉर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स्‌ची स्थापना झाल्यापासून नागरी बॅंकांच्या कामकाजात सुधारणा झाली आहे. नागरी सहकारी बॅंकांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतल्याने त्यांचे दोष दुरुस्ती, सबलीकरण व विलीनीकरण वेळेत शक्‍य झाले आहे. 2008 ते डिसेंबर 2019 पर्यंत राज्यातील 51 दुर्बल नागरी बॅंकांचे अन्य सक्षम नागरी सहकारी बॅंकांमध्ये विलीनीकरण करुन तीन हजार 300 कोटींच्या ठेवी सुरक्षित केल्याचे समोर आले आहे. 

नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका
विलीनीकरण करण्यात आलेल्या नागरी बॅंकांमध्ये मुंबई परिसरातील सर्वाधिक 23 तर पुणे विभागातील 9 आणि उर्वरित महाराष्ट्रातील 51 नागरी बॅंकांचा समावेश आहे. 2008 पासून सातत्याने बदलणारी सहकार क्षेत्रातील सरकारी धोरणे, नोटाबंदी आणि रिझर्व्ह बॅंकेच्या सततच्या निर्बंधाचा सर्वाधिक फटका नागरी बॅंकांना सोसावा लागल्याचे नागरी बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, राज्यातील अडचणीतील, निगेटिव्ह नेटवर्थ असलेल्या 10 जिल्हा बॅंकांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या विरोधानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. त्यानंतर या बॅंकांचे सक्षमीकरण करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले, मात्र पुढे काहीच झाले नाही. आता पंजाब महाराष्ट्र बॅंकेच्या घोटाळ्यानंतर देशातील नागरी बॅंकांच्या व्यवहारावर व व्यवस्थापनावर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध आणले आहेत. यापूर्वी नोटाबंदीच्या निर्णयाचा फटकाही या बॅंकांना सोसावा लागला. त्यामुळे 2016 ते 2018 या कालावधीत सर्वाधिक नागरी बॅंकांचे विलीनीकरण करावे लागले. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधांमुळे आणखी काही नागरी बॅंकांचे विलीनीकरण होऊ शकते, असेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 


बोर्ड ऑफ मॅनेजमेंट बंधनकारक 
लेवल टास्क फोर्स फॉर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक्‍स्‌ची स्थापना झाल्यापासून नागरी बॅंकांच्या कामकाजात सुधारणा झाली आहे. 2008 ते 2019 या कालावधीत राज्यातील 51 नागरी बॅंकांचे सक्षम बॅंकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. बॅंकांची स्थिती उत्तम राहावी या हेतूने आता प्रत्येक नागरी बॅंकांमध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्थापन करणे बंधनकारक आहे. 
- आनंद कटके, विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था 


राज्याची सद्यस्थिती 
एकूण नागरी बॅंका 
499 
विलीनीकरण झालेल्या बॅंका 
51 
ठेवी 
2,84,509 कोटी 
कर्जवाटप 
1,76,151 कोटी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT