download.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

मेसेज व्हायरल झाला, अन्‌ पोलीस पाटील निलंबित

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर,: अमित सदानंद जाधव याने चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा मेसेज व्हायरल केला होता. त्याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्यासह अमित कदम, रोहित नलावडे आणि जयदीप निकम हे तिघेही यात सामील असल्याच्या संशयाने त्यांनाही ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत.

दरम्यान आज प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी आज पोलीस पाटील पदावर असलेल्या अमित जाधव याने कर्तव्यात कसूर केल्याचे तसेच सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू असल्याचे कारण सांगत निलंबित करत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

जाधव याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे अपेक्षित असताना व्हाट्‌सअप्प ग्रुपवरून इस्लामपुरातील मणेर कुटुंब व मुस्लिम समाजमुळे कोरोना विषाणू पसरत असल्याचे मेसेज व्हायरल करत हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण केले असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणात बडा नेता कोण असा प्रश्न उपस्थित करून लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे, असेही म्हटले आहे. अमित जाधव याने जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करता अफवा पसरवली असल्याने त्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत हे निलंबन असेल असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT