Mhaisal Water Sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : वंचित भागाला ‘म्हैसाळ’चे पाणी

पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती; काम सुरू करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

आरग - मिरज पूर्व भागातील आरग, लक्ष्मीवाडी, बेडग, नरवाड या गावांतील पाण्यापासून वंचित असणाऱ्या उंच टेकडीवरील ११०० हेक्‍टर क्षेत्राला नलिका वितरण प्रणालीद्वारे कायमस्वरुपी पाणी देण्याची योजना पाटबंधारे विभागाने आखली आहे. यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रस्ताव मान्य करून लवकर काम सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. येथील गावांना जोडणारा हा भाग पठार या नावाने ओळखला जातो. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यावरील हा भाग उंचीवर आहे. उंच पातळीवरील अंदाजे ११०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. या क्षेत्राला पाणी देण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी म्हैसाळ लाभक्षेत्रातील वंचित क्षेत्राला कायमस्वरुपी पाणी मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.

या मागणीला यश आले. बेडग कालव्यावर पंप हाऊस उभारण्यात येणार आहे. आठरशे मीटर लांबीची ऊर्ध्वगामी नलिका आणि वितरण हौदाच्या पुढे नलिका वितरण प्रणालीद्वारे क्षेत्राला पाणी देण्यात येणार आहे. सध्या हा भाग उंचीवर असून कालवा अथवा सायपन पद्धतीने येथे पाणी पोहोचत नाही. नवीन आराखड्यानुसार हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे. यासाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

वंचित क्षेत्र पुढीलप्रमाणे ...

बेडग २६४, आरग ५३१, नारवड १६६, लक्ष्मीवाडी १३९ हेक्टर. हा सर्व म्हैसाळ कालव्यावरील वंचित असणारा भाग ओलिताखाली येईल आणि ऐन उन्हाळ्यातील पाण्याची समस्या मार्गी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT