MID DAY GRAIN.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

माध्यान्ह भोजनचे धान्य मुलांना वाटा 

सकाळवृत्तसेवा

सांगली- माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, तेल व अन्य साहित्य शालेय विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करावे, असे आदेश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज काढले आहेत. 

राज्यात "कोरोना' विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, खासगी शाळा आणि अंगणवाड्या सध्या बंद आहेत. राज्य शासनाने 31 मार्चपर्यंतचा बंद यापूर्वीच घोषित केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत देशात "लॉक डाऊन' जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतील शिल्लक माध्यान्ह भोजन योजनेचे साहित्य मुलांना मिळावे यासाठी उच्च न्यायालयाने 18 मार्च 2020 रोजी अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप नियमित करावे असे आदेश दिलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने माध्यान्ह भोजन योजनेचे साहित्य वाटपाची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवलेली आहे. या निर्णयाची कार्यवाही करताना पोलिस तसेच जिल्हाधिकाऱ्यांना लेखी माहिती कळवावे असेही शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी आदेशात म्हटले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tipu Sultan Heirs : टिपू सुलतानचे वंशज चक्क चालवतात रिक्षा, सोन्या चांदीत लोळणारे राजघराणे एक-एक रुपयाला झालेत लाचार, आता कुठे आहेत

Kankavli Firing Case : कणकवलीत गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिकाचा खून, अवघ्या २१ वर्षीय तरूणाने केला खून; खुनाचे नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : हातकणंगले तालुक्यात ऊस शेताच्या बांधावर गाजांची झाडे

Crude Oil: तेलाचा दर 2022 इतकाच… तरी भारतासाठी 24% महाग का? आणि दर कमी झाले तरी पेट्रोल का स्वस्त होत नाही?

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

SCROLL FOR NEXT