पश्चिम महाराष्ट्र

स्थलांतरीत कुटुंबांना १० हजाराची मदत द्या; पालकमंत्र्यांचा आदेश

कार्जोळ यांची जत्राट, भिवशी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : महापुरामुळे घरांच्या पडझडीसह पिके, सरकारी इमारती, रस्त्यांचे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणात कोणावरही अन्याय होऊ देऊ नका. घरे, कोसळलेल्या आणि स्थलांतरीत झालेल्या कुटुंबियांच्या खात्यावर त्वरीत दहा हजार रुपयाप्रमाणे तातडीची मदत जमा करण्याचे आदेश जिल्हा पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी दिले. शनिवारी (ता. ७) मंत्री कार्जोळ यांनी तालुक्यातील जत्राट, भिवशी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री कार्जोळ म्हणाले, पुरामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. तत्पूर्वी सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे. यापूर्वी स्थलांतरीत झालेल्या कुटुंबीयांना ३ हजार ८०० रुपयांची मदत केली आहे. आता ती रक्कम दहा हजार रुपये केली आहे. स्थलांतरीत कुटुंबीयांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. घरांसह पिकांची नुकसान भरपाई दिली जाईल. याशिवाय रस्ते, सरकारी इमारत यासह पुरामुळे ज्या मालमत्तांचे नुकसान झाले आहे, त्याचा सर्वेक्षण करून अहवाल द्यावा. सर्वेक्षणात कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी, महापूर काळात थांबलेल्या पाण्याच्या पातळीसह झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तहसीलदार डाॅ. मोहन भस्मे, ग्रेड-२ तहसीलदार प्रवीण कारंडे यांनीही तालुक्यातील पूरस्थितीची माहिती दिली. हालशुगरचे उपाध्यक्ष एम. पी. पाटील, संचालक समीत सासणे, माजी जिल्हा पंचायत सद्स्य सिध्दू नराटे यांनीही पूरग्रस्तांसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी युकेशकुमार एस., पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक, पाटबंधारे विभागाचे जी. डी. मंकाळे, ए. एस. पुजारी, लमाणे, तालुका पंचायतीचे कार्यकारी अभियंते मल्लिकार्जुन उळागड्डी यांच्यासह पवन पाटील, प्रशांत पाटील, काकासो पाटील, विशाल जबडे, विजय जबडे, संतोष शिरोळे, अमित खोत, प्रकाश शिंदे, मधुकर पाटील, नितीन पाटील, किशोर हरदारे यांच्यासह सर्व खात्याचे अधिकारी व पूरग्रस्त उपस्थित होते.

वाऱ्यावर सोडणार नाही

यावेळी उपस्थित पूरग्रस्तांनी मंत्री कार्जोळ यांच्याकडे उपाययोजना करण्याची मागणी केली. मंत्री कार्जोळ यांनी सरकार पूरग्रस्तांना मदतीसाठी कटीबध्द आहे. पूरग्रस्तांना कोणत्याही स्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही. २०१९ मधील भरपाई काही जणांना मिळाली नसल्याचे उपस्थितांनी सांगितले. दरम्यान मंत्री कार्जोळ यांनी २०१९ मधील असंख्य अर्जधारक अपात्र ठरले असल्याचे सांगितले. पात्र असूनही अद्याप ज्यांना मदत मिळाली नाही, असे अर्ज सरकारकडे आहेत, त्यांनाही मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT