मिरज (सांगली ) : मिरज ते पंढरपूर रस्त्यावर सिद्धेवाडी गावानजीक दिसणारा महाकाय मारुती आता महामार्गाच्या बऱ्याच आतील बाजूस स्थलांतरित होणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आकर्षण बनलेला हा महाकाय मारुती आज (मंगळवारी) नव्या महामार्गाच्या कामासाठी स्थलांतरित करण्यात आला. त्यासाठी सुमारे शंभर मजूर, चार मोठी जेसीबी मशीन सलग आठरा तास राबत होती.
रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यापूर्वी मिरज पंढरपूर रस्त्यावर सिद्धेवाडीनजीक मिरजेचे प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांनी त्यांच्या शेतामध्ये या महाकाय मारुतीच उभारणी केली आहे. दोन हजार साली या महाकाय मारुतीची स्थापना करण्यात आली. सुमारे 40 फूट उंची आणि 15 टन वजन असलेल्या या महाकाय मारुतीची मूर्ती या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष आकर्षण बनली. अनेक प्रवासी गाड्या थांबवून या मारुतीचे दर्शन घेऊन पुढे जात असत. यासाठी कोणत्याही प्रकारची पैसे अथवा फी गुजर कुटुंबीयांकडून घेतली जात नसे.
केवळ शिल्पकलेचा एक भव्य आविष्कार म्हणून विजय गुजर यांनी ही कलाकृती बनवली आहे. नव्याने सुरू असलेल्या रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामात या मूर्तीला स्थलांतरित करावे लागणार असल्याचे निश्चित झाले. मूर्ती वाचवण्यासाठीचे सर्व प्रयत्न गुजर कुटुंबीयांनी केले परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही मूर्ती अन्यत्र हलविण्यात शिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे आज ही मूर्ती हलवण्याचे काम सकाळी लवकर सुरू झाले. त्यासाठी शेकडो मजूर आणि चार मोठ्या जेसीबी मशीन मागवण्यात आल्या तरीही सायंकाळपर्यंत ही मूर्ती ती जागची हलली नाही. रात्री उशिरापर्यंत ही मूर्ती हलवण्याचे काम सुरू होते.
कलाकाराच्या भावना सरकारला काय समजणार?
अत्यंत कष्टाने बनवलेली ही महाकाय मारुतीची मूर्ती हलवताना वेदना होत आहेत. किमान कलेकडे पाहून तरी मार्ग अन्यत्र वळविण्यात आला असता. महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी थोडेफार सहकार्य केले असते तर ही मूर्ती वाचली असती परंतु सरकारी यंत्रणेसमोर आमचा नाईलाज झाला. अत्यंत जड अंतकरणाने ही मूर्ती मला स्थलांतरित करावी लागते आहे.विजय गुजर
शिल्पकार, मिरज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.