येवलेवाडी (ता. वाळवा) - येथे "स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी मुंबईला निघालेल्या दुधाच्या टॅंकरमधील दूध रस्त्यावर सोडले.
येवलेवाडी (ता. वाळवा) - येथे "स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी मुंबईला निघालेल्या दुधाच्या टॅंकरमधील दूध रस्त्यावर सोडले. 
पश्चिम महाराष्ट्र

मुंबईला जाणारा दुधाचा टॅंकर फोडला

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंदला आज वाळवा तालुक्‍यातील येवलेवाडी (ता. वाळवा) नजीक हिंसक वळण लागले. जिल्ह्यात पहिली ठिणगी पडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे निघालेल्या दुधाच्या टॅंकरच्या काचा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी येवलेवाडीनजीक फोडल्या. दगडफेक करून टॅंकरच्या समोरच्या काचा फोडून टॅंकरमधील दूध रस्त्यावर सोडले. टॅंकर वारणा दूध संघाचा असल्याचे समजते.

गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, यासाठी आज दूध संकलन, तसेच वाहतूक बंदचे आवाहन करण्यात आले होते. काल कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत दूध उत्पादक कृती समितीने एक दिवस संकलन बंद करण्यास मान्यता दिली. तरीही टॅंकर मुंबईला निघाल्याचे समजताच संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास येवलेवाडीनजीक टॅंकर अडवून काचा फोडल्या. वीस-पंचवीस कार्यकर्ते एकत्र आले. सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. दूध रस्त्यावर सोडून देऊन घटनास्थळावरून पसार झाले.

शेट्टींशी उद्धट वर्तन केल्याचा राग
खासदार राजू शेट्टी आज सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असलेल्या एकाच्या विवाहानिमित्त कऱ्हाड येथे गेले होते. आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्यावर "वॉच' ठेवला होता. लग्नाच्या ठिकाणी पोलिसांनी खासदार शेट्टी यांना उलटसुलट प्रश्न विचारले. पोलिसांच्या या उद्धट वर्तनाचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे काहींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT