Minister Gadakh went on a two-wheeler to find out his problem 
पश्चिम महाराष्ट्र

जलसंधारणमंत्री गडाखांनी दुचाकीवर जाऊन जाणून घेतली त्यांची समस्या 

सकाळ वृत्तसेवा

सोनई : कोरोनाचे सावट उभे राहिल्यापासून सोनईचा गडाख परिवार अधिक संवेदनशील झाला आहे. मंत्री शंकरराव गडाख, प्रशांत पाटील गडाख व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे आपापल्या परीने जनतेची मदत करीत आहेत. राज्यात सर्वप्रथम सुरक्षा व्यवस्थेवरील पोलिस यंत्रणा गडाख यांनीच नाकारली होती. तसेच त्यांचे वडील यशवंतराव यांनी लगेच आर्थिक मदत जाहीर केली. प्रशांत पाटील यांनीही तोच कित्ता गिरवला. आपल्या मतदारसंघात कोणी उपाशी राहू नये अशी सर्वाचीच मनिषा आहे. त्यासाठी ते रात्रंदिवस खस्ता खातात. कालचेच बघा ना.

सायरनचा आवाज, पोलिस बंदोबस्त, मागे-पुढे अधिकारी-कर्मचारी, स्वीय सहायक व कार्यकर्ते, असा सगळा लवाजमा बाजूला ठेवत आज जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीवर जाऊन भेट दिली.

"घाबरू नका, कोरोनाच्या संकटावर आपण मात करू,' असा धीर त्यांना दिला. त्यांच्या या साधेपणाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. सोनई येथील कार्यकर्ते संतोष क्षीरसागर यांच्या दुचाकीवर बसून मंत्री गडाख यांनी खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 कुटुंबांची अडचण जाणून घेतली. नामदेव सावंत, मोहन शेगर, साहेबराव शिंदे, भागाबाई सावंत, रुपाबाई शिंदे यांनी कोरोनामुळे उपासमारीची वेळ आल्याचे सांगितले. 


मंत्री म्हटलं, की मागे-पुढे पोलिस वाहनांची गर्दी, सायरनचा आवाज, संबंधित खात्याचे अधिकारी व वजनदार कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो. आज सकाळी मंत्री गडाख यांनी अतिशय साध्या पद्धतीने वस्तीतील कुटुंबांच्या घरोघर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मागील आठवड्यात गडाख यांनी स्वत:चा बंदोबस्त कोरोना प्रतिबंधासाठी देण्याचा आगळा-वेगळा निर्णय घेतला होता. 
मंत्री गडाख यांनी भेट दिल्याने मोठा धीर आला. त्यांना रेशन कार्ड, रस्ता, पाण्याची समस्या सांगितली. त्यांनीही लवकरच आमचे प्रश्न मार्गी लागण्याचे आश्‍वासन दिले, असे तेथील नामदेव सावंत यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय कौशल्याने कोरोनामुळे उद्‌भवलेली परिस्थिती हाताळत आहेत. या संकटाचा सामना करताना, सर्वांनीच गंभीर राहणे गरजेचे आहे. सर्वांचीच अडचण आणि समस्या झाली आहे. सरकार सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. घरात राहा, सुरक्षित राहा. 
- शंकरराव गडाख, जलसंधारणमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT