Minister Shobha Karandlaje esakal
पश्चिम महाराष्ट्र

दत्त शिरोळचा 'क्षारमुक्त जमीन पॅटर्न' देशभर राबविणार

सकाळ डिजिटल टीम

तात्यासाहेब कामत, सकाळ वृत्तसेवा

मांजरी : दत्त शिरोळचा `क्षारमुक्त जमीन पॅटर्न` देशभर राबविणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीराज्यमंत्री शोभा करंदलाजे (Minister Shobha Karandlaje) यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधील श्रीदत्त कारखान्याच्या (Shridatta Sugar Factory) वतीने गेल्या चार-पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून कार्यक्षेत्रात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबविला जात आहे. हा `दत्त पॅटर्न` समजून घेण्यासाठी शुक्रवारी (ता. २७) बंगळूर येथे कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री मुरगेश निराणी (Minister Murugesh Nirani) व दत्त साखर कारखान्याचे (Datta Sugar Factory) अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीत कारखान्याच्या वतीने प्रकल्पाबद्दल पॉवर पॉईट प्रेजेंटेशनद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली.

शिरोळ तालुक्यात १० हजार हेक्टर जमीन क्षारपड आहे. गेल्या ३० ते ४० वर्षापासून कोणत्याही पिकाविना त्या पडून होत्या.

उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी, किमान १० राज्यात अशा पद्धतीचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती मंत्री करंदलाजे यांच्याकडे केली. त्या म्हणाल्या, या प्रकल्पाची यशस्वीता व शेतीच्या दृष्टीने महत्त्व विचारात घेवून सविस्तर माहिती घेवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने अशाच पध्दतीने केंद्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात क्षारमुक्त जमिनीचा प्रकल्प राबविणार आहोत.गेल्या अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या जमिनी या प्रकल्पामुळे उत्पादनक्षम होत असल्याने प्रकल्प कौतुकास्पद असल्याने तो देश पातळीवर अनुकरणीय आहे.

बैठकीस कर्नाटक राज्याचे उद्योग आयुक्त गुंजन कृष्णा, अतिरिक्त वाणिज्य सचिव रामन रेड्डी, सचिव कृषी विभाग दलवाई, फलोद्यान व कृषी विभागाचे सचिव, दत्त कारखान्याचे संचालक अरुण देसाई, इंद्रजीत पाटील, बाहुबली पाटील, कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, किर्तीवर्धन मरजे व सुदर्शन तकडे आदी उपस्थित होते.

असा आहे क्षारमुक्त जमीन पॅटर्न

शिरोळ तालुक्यात १० हजार हेक्टर जमीन क्षारपड आहे. गेल्या ३० ते ४० वर्षापासून कोणत्याही पिकाविना त्या पडून होत्या. तसेच काही हजारो हेक्टर जमिनी क्षारपड होत असून त्यातील उत्पादन क्षमता अत्यल्प आहे. नापीक जमिनींमुळे शेतकऱ्यांनाही वस्तुतः आपल्या जमिनी कोठे आहेत, याचीही कल्पना नव्हती. क्षारपड समस्येमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे दत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेतला आहे. ज्या-त्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून सहकारी संस्था स्थापन केली. जमिनी क्षारमुक्त होण्याकरीता कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणाली व बंदीस्त मुख्य पाईपलाइन या तंत्राचा वापर करून क्षारमुक्तीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी १८ गावांमध्ये स्वखर्चातून राबवित आहेत. त्याद्वारे ६६९० एकर इतकी जमिन क्षारमुक्त होणार आहे. प्रकल्पांतर्गत १५२ कि. मी. मुख्य बंदीस्त पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे. तसेच १८२५ एकर इतक्या जमिनीमध्ये कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणालीचे काम पूर्णत्वास जावून या जमिनी पिकावू झाल्या आहेत. या प्रकल्पामुळे एका वर्षात जमिनीतील क्षारतेत ८३ टक्के इतकी घट झाली आहे. उत्पादनात दुपटीने वाढ झाली असून काही ठिकाणी १०० टक्के इतकी वाढ झाली आहे. प्रकल्पास देश व राज्य पातळीवर विविध मान्यवर व तज्ज्ञांनी भेट देवून प्रकल्पाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केला आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT