Minister of State for Health Rajesh Patil Yadravkar detained at Kognoli toll plaza 
पश्चिम महाराष्ट्र

आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पोलीसांनी बेळगावात अडवले

मिलिंद देसाई

बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेल्या आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कोगणोळी टोल नाक्यावर अडविण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली 17 जानेवारी रोजी सीमाप्रश्नासाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन केले जाते यासाठी मंत्री यड्रावकर बेळगावला निघाले होते. 

मात्र महाराष्ट्रातील कोणीही बेळगावला अभिवादन कार्यक्रमासाठी येऊ नये यासाठी अगोदरच कोगणोळी  टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे यड्रावकर टोल नाक्यावर पोहचताच त्यांची अडवणूक करण्यात आली. यावेळी त्यांनी अशा प्रकारे अडवणूक करता येत नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी दादागिरी करत कोणत्याही परिस्थितीत जाऊ दिले जाणार असे सांगत त्यांची अडवणूक केली. याच्या निषेधार्थ टोलनाक्यावर बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कर्नाटक पोलिसांचा धिक्कार असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. तसेच कर्नाटक सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध केला. यावेळी मंगेश चिवटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

BJP-MNS आमने सामने, पोलीस ठाण्याबाहेरच चारचाकी फोडून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपच्या बड्या नेत्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

कैरी घातलेलं कोलंबीचं कालवण, सुकटीची किस्मुर... निवेदिता यांनी सांगितलं कसं असतं त्यांच्याकडचं सारस्वत पद्धतीचं जेवण

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT