Minister Tanapure resigns, but
Minister Tanapure resigns, but 
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री तनपुरे यांनी दिला राजीनामा, पण कशाचा? 

सकाळ वृत्तसेवा

मंत्री तनपुरे यांनी दिला राजीनामा, पण कशाचा? 

राहुरी : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काल (शनिवारी) नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपविला. "राज्यमंत्रिपदाची जबाबदारी वाढल्याने नगराध्यक्षपदासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. राहुरीच्या विकासाची गती कमी होऊ नये, यासाठी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,' असे कारण देत, भावी नगराध्यक्षांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही तनपुरे यांनी दिली आहे. 

ही केली कामे 
राहुरी तालुक्‍यात तनपुरे यांनी पाच वर्षे विविध सामाजिक उपक्रम, तरुणांचे संघटन, विविध प्रश्नांवर आंदोलने करून स्वतःची ओळख निर्माण केली. तीन वर्षांपूर्वी जनतेतून त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. शहरात बंदिस्त गटारे, वाड्या-वस्त्यांवरील रस्ते, पथदिव्यांची कामे मार्गी लावली. वैद्य हॉस्पिटल व सरोदे वस्तीजवळील मोकळ्या भूखंडांचे सुशोभीकरण केले. गोकुळ कॉलनीत योग केंद्र, नवीन 32 व्यापारी गाळ्यांची कामे सुरू केली. 

जाणून घ्या : बंद अच्छा है, शिर्डीत साईभक्तांच्या भावना 

डिजिटल वर्ग केले 
पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यास सुरवात केली. प्रत्येक शाळेत स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्‍टर देऊन "डिजिटल वर्ग' करून पालिकांच्या शाळांची गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न केला. 

तनपुरे कुटुंबात 35 वर्षे आमदारकी होती
पालिकेच्या 29 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळविली. योजनेच्या कामास लवकरच सुरवात होईल. राहुरी विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेले भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला. तनपुरे कुटुंबात 35 वर्षे आमदारकी होती; परंतु मंत्रिपदाने कायम हुलकावणी दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच आमदार झालेल्या तनपुरे यांना थेट राज्यमंत्रिपदी काम करण्याची संधी दिली. 

नवीन नगराध्यक्ष कोण? 
राज्यमंत्री तनपुरे यांचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. भावी नगराध्यक्ष जनतेतून, की नगरसेवकांमधून निवडला जाईल, हे निवडणूक आयोग ठरविणार आहे. दरम्यान, नवीन नगराध्यक्ष कोण, यावर चर्चा झडत आहेत. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचे चिरंजीव हर्ष तनपुरे यांचे नाव चर्चेत आघाडीवर आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT