Minister Thorat says try to bring me problems 
पश्चिम महाराष्ट्र

अडचणी आणण्याचे बरेच प्रयोग झाले पण.. मंत्री थोरातांचा रोख कोणाकडे 

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आपल्या राजकीय यशाच्या चढच्या कमानीचे रहस्य उलगडले. नेमके काय पथ्य पाळल्याने इथपर्यंत हेही स्पष्ट केले. हे सांगत असताना माझे राजकारण संपवणाऱ्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना कुठेच सापडलो नाही, हेही त्यांनी सांगितले.

""मागील पाच वर्षांत मला अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रयोग झाले. शेवटी मी चांगल्यासाठी काम करत आहे. कुठेही काही चूक होऊ नये, असा माझा प्रामाणिक हेतू आहे. त्यामुळे कुठे सापडलो नाही. आताही मी शुद्ध हेतूने काम करत आहे. पुढील पाच वर्षे मंत्री राहणार आहे,'' असा राजकीय टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला. येथे आयोजित आढावा बैठकीत आज सायंकाळी ते बोलत होते.

नियम मोडू नका 
सामान्य जनतेच्या भल्यासाठी नियम मोडले, तर उद्या आमच्यावर आरोप होतील. आमच्याभोवती काही उद्योग झाला, तर त्या वेळी तुम्ही फक्त एकदा भेटायला याल. सरकारमध्ये काम करीत असताना प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. काही जण आपले काही चुकले की काय हे पाहायला येतात. मागील काळात अडचणी आल्या नाहीत, असे समजू नका.

काम करण्याचा प्रामाणिक हेतू आहे. शुद्ध हेतूनेच काम करत आहोत. मिळालेल्या संधीचा उपयोग करीत जनतेच्या भल्यासाठी चांगले काम करीत राहणार आहे. काम करताना प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते, असे थोरात यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT