Ramchandra Kharat Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Miraj Crime : कुऱ्हाडीने वार करून चुलत भावाचा खून; खुनानंतर संशयित कुऱ्हाड घेऊन पोलिसांत हजर

पूर्ववैमनस्यातून चुलत भावाने भावाचाच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना बेडग-मल्लेवाडी रस्त्यावरील शेळके वस्तीवर घडली.

सकाळ वृत्तसेवा

मिरज - बेडग (ता. मिरज) येथील बेडग-मल्लेवाडी रस्त्यावरील शेळके वस्तीवर पूर्ववैमनस्यातून चुलत भावाने भावाचाच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली. खुनानंतर संशयित कुऱ्हाडीसह मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. रामचंद्र शंकर खरात (बेडग) असे मृताचे, तर सचिन बबन खरात (बेडग) असे संशयित चुलत भावाचे नाव आहे. या प्रकरणी मृत रामचंद्र खरात यांचे पुत्र आकाश खरात यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रामचंद्र खरात व सचिन खरात हे नात्याने सख्खे चुलत भाऊ आहेत. बेडगेतील मल्लेवाडी रस्त्यावरील शेळके वस्ती परिसरात त्यांची शेतात शेजारी घरे आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून वाद आहे. वादाचे पर्यवसान काल (ता. १९) रात्री आठच्या सुमारास हाणामारीत झाले.

दरम्यान, आज घराकडे येण्याच्या रस्त्यावर सचिन खरातने रामचंद्र खरात यांच्या डोक्यात, मानेवर व पाठीवर वार करून त्यांचा खून केला. सचिन हा रामचंद्र यांना व कुटुंबीयांना पूर्वीपासून शिवीगाळ करीत होता. याआधी आकाश खरात यांच्या पत्नीने सचिनविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. तेव्हापासून दोन कुटुंबांत धुसफूस सुरूच होती. त्यावरूनच सायंकाळी साडेसातच्या सुमारास घटनास्थळी सचिन खरात व रामचंद्र खरात यांचा वाद झाला.

सचिनने रामचंद्र यांना शिवीगाळ करून धमकी दिली. त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिल्याने सचिनने डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीने वार करून रामचंद्र यांचा खून केला. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, सचिन खरातला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पप्पू यादवांचा पुजाऱ्याचा वेष अन् राहुल गांधींची श्रद्धाळूची भूमिका; संसदेतील 'त्या' प्रकारावर लोकसभा अध्यक्ष नाराज

IND vs SL Test : जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार? प्रमुख गोलंदाजाचा फिटनेस अहवाल आला समोर; नेमकं काय आहे त्यात?

Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांना चाप! पुणे पोलिसांच्या डिजिटल कारवाईत 845 पोस्ट हटवल्या, 132 गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : डेंगळे पुलाखाली चेंबरवर अडकलेल्या युवकाची दलाच्या जवानांकडून सुटका

Green University: मराठवाड्यासाठी अभिमानाची बातमी! स्वारातीम विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक झेप; देशात 12 वा क्रमांक

SCROLL FOR NEXT