Miraj court relocation stoped; This proposal was also rejected 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज न्यायालयाचे स्थलांतर रखडले; हा प्रस्तावही फेटाळला

सकाळवृत्तसेवा

मिरज : सांगलीच्या राजवाडा चौकातील मिरज न्यायालय तात्पुरत्या स्वरूपात विजयनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या बिल्डिंग कमिटीने नामंजूर केला. तसे पत्र शुक्रवारी जिल्हा न्यायालय प्रशासनाला प्राप्त झाले.

सांगलीतील राजवाडा चौक हा पुरपट्ट्यात येतो. यंदा पुन्हा पुरपरिस्थितीचा धोका आहे. मिरज न्यायालय जिल्हा न्यायालयाच्या मुख्य इमारतीतील बी विंगमध्ये स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मिरज बार असोसिएशन आणि मिरज न्यायालय कृती समितीने दिला आहे. कमिटीने प्रस्ताव कोणत्या काराणासहीत फेटाळला याची माहिती घेऊन कृती समिती भूमिका स्पष्ट करेल, असे ऍड. ए. ए. काझी यांनी सांगितले. 

मिरज न्यायालय इमारत धोकादायक झाल्याचे कारण देत न्यायालय सांगलीतील राजवाडा चौकात हलवण्यात आले. राजवाडा चौक पुरपट्ट्यात येतो. गतवर्षी सन 2019 मध्ये राजवाडा चौक तब्बल दहा दिवस पुराच्या पाण्यात होता. यंदाही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने जिल्हा प्रशासन पुरपट्ट्यातील काही कार्यालयांना नोटीसा दिल्या आहेत.

राजवाडा चौकातील मिरज न्यायालय तात्पुरता स्वरूपात विजयनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू होत्या. तशी मागणी मिरज बार असोसिएशन आणि मिरज न्यायालय कृती समितीने केली होती. सांगली वकील संघटनेने त्याला विरोध केल्याचा आरोप मिरज न्यायालय कृती समितीने केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT