miraj
miraj sakal
पश्चिम महाराष्ट्र

Miraj : नशेसाठी होतोय औषधांचा वापर

प्रमोद जेरे

मिरज : नशेच्या आहारी गेलेल्या गर्दुल्यांनी आता नशेसाठी वैद्यकीय उपचारांसाठीच्या औषधांचा वापर सुरू केला आहे. नशेसाठी गर्दुल्यांकडून होणारी नशेच्या भरमसाठ औषधांची खरेदी ही आता पोलिस आणि औषध विक्रेत्यांसाठीची नवी डोकेदुखी ठरली आहे. गांज्या आणि दारुपेक्षा नशेसाठी काही औषधे स्वस्त मिळत असल्याने गर्दुल्यांनी नशेसाठी औषधांचा नवा पर्याय निवडला आहे.

शहरातील अनेक औषध विक्रेत्यांकडे नियमीतपणे शेकडो गर्दुले डॉक्टरांच्या बनावट चिठ्ठया घेऊन नशेच्या औषधांसाठी नियमीतपणे येत आहेत. काही जुन्या औषध विक्रेत्यांकडून बनावट चिठ्ठया अचूकपणे ओळखल्या जातात हे औषध विक्रेते अशा गर्दुल्यांना औषध नसल्याचे सांगून बाहेरचा रस्ता दाखवतात. यावर गर्दुल्यांनी आता नवी दुकाने आणि दुकानातील नवे नोकर हेरुन त्यांच्याकडून नशेसाठीची औषधे घेण्यास सुरवात केली आहे.

शहरातील रेल्वे आणि बस स्थानक परिसरातील गर्दुल्यांच्या टोळ्यांकडूनही याच औषधांचा वापर नशेसाठी केला जात असल्याचे त्यांच्याकडील पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या गर्दुल्यांकडुन तुरूगांत असतानाही अश्या प्रकारच्या औषधांच्या चिठ्ठ्या पोलिसांना दाखवुन त्यांचीही दिशाभुल करण्याचा प्रयत्न करतात. काही गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेल्या अनेक संशयितांची झड़ती घेतानाही अनेकांच्या खिश्यात डॉक्टरांच्या नावाच्या बनावट चिठ्ठ्याही पोलिसांना मिळाल्या आहेत. यापैकीच एका संशयितास बनावट ग्राहक म्हणुन पाठवल्यानतंर वंटमुरे कॉर्नरवरील एका दुकानात नशेसाठीची औषधे विकताना औषध विक्रेत्यास रंगेहाथ पकडले. या व्यावसायिकाविरुध्द कारवाईचा प्रस्ताव औषध प्रशासनाने पुण्याच्या आयुक्त कार्यालयाकडे पाठविला आहे.

यापुर्वी नशेखोरांकडुन मानसोपचारासाठीच्या झोपेच्या औषधांचा केला जात असे. पण अलिकडे मानसोपचार तज्ज्ञांनीच रुग्णालयातच औषधांची दुकाने सुरु केल्याने नशेखोरांची अडचण झाली आणि नशेखोरांनी तेथे जाणे बंद केले. पण लगेचच औषधांचा ब्रँड बदलला आणि सर्वसाधारण दुकानात मिळणाऱ्या औषधांचा वापर नशेसाठी करण्यास सुरवात केली आहे. काही विशिष्ट रोगांवरील औषधे जास्त प्रमाणात घेतल्याने नशा येत असल्याची खात्रीही याच गर्दुल्यांनी केली आहे आणि त्यानतंर आता याच औषधांच्या डॉक्टरांच्या नावाने बनावट चिठ्ठ्या बनवून त्याद्वारे ही औषधे नशेसाठी वापरली जात आहेत.

या औषधांचा होतो वापर

औषधांचे प्रामुख्याने नार्कोटिक्स आणि सिरेटिव्ह असे दोन प्रकार असतात. यामध्ये नार्कोटिक्स प्रकारातील औषधे ही मानसोपचार तज्ज्ञांकडून मनोविकाराच्या रुग्णांना बरे करण्यासाठी वापरतात. ज्या औषधांमुळे रुग्णाला गुंगी येते तर सिरेटिव्ह प्रकारच्या औषधांमध्ये थोडी झोप येणाऱ्या किंवा वेदना कमी होणाऱ्या औषधांचा समावेश असतो. यामध्ये नायट्राव्हेट, नायट्राजेफाम, कोडीनसिरप, प्रेगालिन, निओगँबालिन, लिओसेट्रीजीन, सीपीएम यासह स्पास्मो प्रॉक्सिवन या औषधांचा वापर नशेखोरांकडून होतो.

मिरज रेल्वे स्थानक परिसरात काही दिवसांपूर्वी गर्दुल्यांकडून घडलेले गंभीर गुन्हे हे तिहेरी नशा केल्यामुळे घडल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. गांजा आणि दारूचे सेवन करून पुरेशी नशा चढत नसल्याने काही गर्दुल्यांनी औषधांचे सेवन केले जाते. ज्यामुळे त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत, अशा प्रकारे तिहेरी नशा करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

- रविराज फडणीस, सहाय्यक पोलिस निरीक्षक,

महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे ,मिरज

औषध दुकानातून नशेसाठी किंवा बेकायदेशीरपणे डॉक्टरच्या चिठ्ठी विना काही औषधे विकत नेण्याबाबतच्या तक्रार आल्यानंतर संबंधित औषध विक्रेत्यास कारवाईची नोटीस देऊन त्याच्याकडून खुलासा मागवला जातो. त्याचा औषध विक्रीचा परवाना रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात येतो.

- विकास पाटील, औषध निरीक्षक, औषध प्रशासनविभाग सांगली

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही, त्यातही शेड्युल एच वन प्रकारची औषधे तसेच चिठ्ठीची खात्री केल्या शिवाय विकू नयेत, यासह शासनाच्या अन्य सूचना सातत्याने आमच्या संघटनेकडून विक्रेत्यांना दिल्या जात असतात.

- विशाल दुर्गाडे, अध्यक्ष, सांगली जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT