Miraj ganpati visarjan procession 28 hours orders to register cases against laser show sakal
पश्चिम महाराष्ट्र

Ganesh Visarjan 2023 : मिरजेची विसर्जन मिरवणूक २८ तास; साऊंडकडे दुर्लक्ष, लेझर शोविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मिरवणुकीत आवाजाचा प्रचंड दणदणाट झाला. त्याकडे पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले. पोलिसांनी कानात कापसाचे बोळे घालून घेतले होते.

सकाळ वृत्तसेवा

मिरज : ‘बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात आणि प्रचंड जोश-जल्लोषात निघालेली, मात्र पावसाच्या आगमनामुळे गती संथ झालेली गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल २८ तास चालली. गुरुवारी सकाळी नऊ वाजता श्री शिवाजी गणेश मंडळाच्या मानाच्या दिंडी सोहळ्याने यंदाच्या मिरवणुकीची सुरवात झाली.

आज सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी संत रोहिदास मंडळाने श्री गणेश तलावात श्रींचे विसर्जन केल्यानंतर मिरवणूक संपली. त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी आपल्या बाप्पांची मिरवणूक काढत दुपारी विसर्जन केले.

मिरवणुकीत आवाजाचा प्रचंड दणदणाट झाला. त्याकडे पोलिसांनी साफ दुर्लक्ष केले. पोलिसांनी कानात कापसाचे बोळे घालून घेतले होते. कान सुरक्षित रहावेत म्हणून ही व्यवस्था होती, मात्र ते ‘दुर्लक्ष’चे प्रतीक ठरले. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी लेझर शोविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यांनी समोर उभे राहून त्याचा पंचनामा करून घेतला. गुन्हा कधी आणि कोणत्या कलमानुसार दाखल होणार, याबाबत स्पष्ट नाही. अपवाद वगळता संयमाने, कोणत्याही तणावाशिवाय मिरवणूक झाल्याने पोलिसांनी निश्‍वास सोडला.

भव्य स्वागत कमानी, आकर्षक मुर्तींची तेवढीच देखणी सजावट, पारंपारिक वाद्य व वेशभूषा करत सहभागी झालेले महिला व पुरुष, तरुण, युवती, मुले असे वातावरण गुरुवारी सकाळपासून सुरु होते. रात्री आवाजाचा दणदणाट सुरु झाला.

दीड तास पाऊस पडला. पाणी-पाणी झाले. त्यामुळे मिरवणूक संथ झाली. पोलिसांनी मिरवणूक पळवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना वाहने वेगाने पुढे नेण्यास आग्रह केला. दारू पिवून नाहक धिंगाणा घालणाऱ्यांना काठीचा प्रसाद दिला. सराफ कट्टा परिसरात काहींना चोपून काढले.

मिरवणुकीत अज्ञाताचा मृत्यू

मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका अज्ञाताचा रात्री दहाच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या तोंडातून फेस आला होता, अशी माहिती सांगण्यात आली. रात्री उशीरा शवचिकित्सा करण्यात आली. सदर इसम कुठून आला होता, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. आवाजाच्या दणक्यामुळे मृत्यू झाला आहे का, याबाबतही स्पष्टता नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT