suside sakal
पश्चिम महाराष्ट्र

मिरज : ST चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मिरजेतील प्रकार; आगारप्रमुख ड्यूटी देत नसल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

मिरज: आगारप्रमुख मर्जीतील कर्मचाऱ्यांना जादा फेऱ्या देऊन आपल्याला ड्यूटी न देता अन्याय करत असल्याचा आरोप करीत मिरजेतील कर्मचाऱ्याने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मेहबूब मौला आंबेकरी (रा. मिरज) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावेळी तेथे उपस्थित अन्य कर्मचाऱ्यांनी आंबेकरी यांच्या दिशेने वेळीच धाव घेऊन रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेली अनेक दिवस आगारप्रमुख हे मर्जीतील कर्मचाऱ्यांना फेऱ्या देत आहेत. मात्र, चालक मेहबूब आंबेकरी यांनी आपल्याला काम मिळत नसल्याचा आरोप करत बस स्थानकावरील कार्यशाळेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संप मिटल्यामुळे एसटीची चाके रूळावर येत असताना हा प्रकार घडल्यामुळे कर्मचाऱ्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. मिरज आगारात मर्जीतील कर्मचाऱ्यांना अधिकारी एसटीच्या जादा फेऱ्या देत आहेत. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांना दिवसभर बसून काम न मिळता परत जावे लागत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना महिन्यांचा पगार कमी पडत असल्याचा आरोप चालक आंबेकरी यांनी केला आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांत मेहबूब आंबेकरी यांच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आगारप्रमुख शिवाजीराव खांडेकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank of Baroda: 'बँक ऑफ बडोदा'चा डेटा कसा 'लीक' झाला? ग्राहकांना धोका आहे का? बँकेने दिलं अधिकृत स्पष्टीकरण

Virar Timber Smuggling: विरारमध्ये भाजीपाल्याच्या टेम्पोआडून खैर लाकडाची तस्करी उधळली; वन विभागाची पहाटे धाडसी कारवाई, मुद्देमाल जप्त

Kelghar Ghat Landslide : चालक अजरुद्दीनच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव! केळघर घाटात जेसीबीवरच मोठी दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्ग पूर्णपणे ठप्प

Bhima River Farmers: भिमा नदीत पाणी सोडूनही वीज नाही; संतप्त नदीकाठच्या शेतकऱ्यांची ‘आठ तास वीज नसेल तर पाणीही नको’ अशी सोशल मीडियातून हाक

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT