Mirajkar's health is in danger due to sewage on the road 
पश्चिम महाराष्ट्र

रस्त्यावरील सांडपाण्यामुळे मिरजकरांचे आरोग्य धोक्‍यात

प्रमोद जेरे

मिरज : दहा दिवसांपासून येथील बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाचा परिसर गटारगंगेने तुडुंब भरला आहे. गटारीतील मैलायुक्त घाण आणि येथील नागरिकांचे जगणे मुश्‍कील बनले. एवढे विदारक चित्र असूनही शहराचे कारभारी मात्र आपापल्या मस्तीत मश्‍गुल आहेत. एकीकडे सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ सुरू असूनही कारभाऱ्यांचे वर्तन मात्र संतापजनक असल्याने रस्त्यावरील वाहत्या गटारगंगेत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही गटांगळ्या खाव्या लागणार आहेत, हे निश्‍चित. 

मुळातच मिरज शहर हे वैद्यकीय केंद्र असले तरी सध्या मात्र याच वैद्यकीय नगरीला अस्वच्छतेने सध्या ग्रासले. त्यातच शहराची भौगोलिक रचनाही तशी विचित्र आहे. याचा विचार करूनच 60 वर्षांपूर्वीच्या तत्कालीन पालिका पदाधिकाऱ्यांनी मिरज शहरातील सांडपाण्याच्या निचऱ्याची अतिशय चांगली शाश्वत व्यवस्था केली आणि हे सांडपाणी मिरज-बेडग रस्त्यावर एका प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून तेथील शेतीला दिले. 

ज्यामुळे कृष्णा नदीपात्रात हे पाणी पोचले नाही. यासाठी निष्णात अभियंत्यांनी आपले कौशल्य पणाला लावले. आणि ही सुंदर योजना अमलात आणली. पण, गेल्या 35 वर्षांत येथील तत्कालीन व विद्यमान कारभाऱ्यांनी नेमक्‍या याच सांडपाण्याच्या योजनेचे तीन तेरा केले. आणि या विध्वंसात भर घातली ती निव्वळ पगार आणि सोयीसाठी बदलून आलेल्या खाऊपासरी अभियंत्यांनी. त्यामुळे एकूणच सांडपाण्याच्या निचऱ्याचे नियोजनच कोलमडले. ज्याची मोठी किंमत या परिसरातील सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना मोजावी लागत आहे. शहरातील सगळे सांडपाणी सध्या बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात साचले आहे. 

कोणालाही सोयरसुतक नाही 
सध्या या परिसरातील किमान शेकडो हॉटेल, हातगाडीवाले आणि अन्य व्यवसायही बंद आहेत. या परिसरातील सर्वंच घरांमध्ये घरटी किमान एक तरी व्यक्ती आजारी असून, अशा आजारी व्यक्तींची संख्या हजारोंवर आहे. व्यवसाय बंद असल्याने बेकार झालेल्या कामगारांची संख्या शेकडोच्या पटीत आहे. निव्वळ गटारीच्या पाण्यामुळे सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होण्याची ही पहिलीच वेळ असावी. तरीही याचे कसलेही सोयरसुतक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दूरच, कोणत्याच राजकीय पक्षाला नाही. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT