पश्चिम महाराष्ट्र

कसे काय बुवा...'त्यांचे' 200 रुपयांवर भागते

सकाळ वृत्तसेवा

सातारा : वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी रुग्णांची परवड होत आहे. तपासणीचा नंबर लावण्यासाठी 15 दिवस थांबावे लागत आहे. त्याचबरोबर शासकीय शुल्काव्यतिरिक्त त्यांना जादा 400 रुपयांचा भुर्दंड 
सोसण्याबरोबरच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खासगी दवाखान्यांतही "वेटिंग'ला थांबावे लागत आहे. 

जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बाह्यरुग्ण विभाग तसेच शस्त्रक्रियागृहावर त्याचा परिणाम होतच असतो. मात्र, विविध दाखल्यांसाठीही रुग्णांना आता 15 दिवस, महिन्यापासून एक वर्षापर्यंतची वाट पाहायला सांगितले जात आहे. स्वावलंबन कार्डसाठी पुन्हा नोंदणी करावी लागत असल्याने दिव्यांग व अपंगांच्या प्रमाणपत्रासाठी तर वर्षभरानंतरची तारीख दिली जात आहे. त्यामुळे रुग्ण सुविधेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचप्रमाणे फिटनेस प्रमाणपत्रासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
 
विविध शासकीय कार्यालयांमधील नोकरभरती, शासकीय विद्यालयांत प्रवेश मिळालेले विद्यार्थी, शासकीय कार्यालयांमध्ये ठराविक वर्षानंतर कर्मचाऱ्यांना करावी लागणारी वैद्यकीय तपासणी, त्याचबरोबर पदोन्नतीला पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाही फिटनेस प्रमाणपत्र लागत असते. काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांनाही फिटनेस प्रमाणपत्राची अट घालण्यात आली होती. त्यामुळे फिटनेस प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज जिल्ह्याच्या विविध भागातून नागरिक येत असतात.
 
केसपेपर काढल्यानंतर संबंधितांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी 260 रुपये शासकीय शुल्क भरावे लागते. त्यानंतर बाह्यरुग्ण विभागातील विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्रमाणपत्र देण्यात येते. मुळात बाह्यरुग्ण विभागाच्या सकाळच्या कालावधीत नागरिकांची संपूर्ण विभागातील सह्या, रक्त तपासणी, ईसीजी अशा चाचण्या पूर्ण होत नाहीत. सायंकाळच्या बाह्यरुग्ण विभागात काही विभागांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे एका दिवसात ही तपासणी म्हणजे रुग्णासाठी दिव्यच असते. दोन ते तीन दिवस त्याला रुग्णालयात घालवल्यानंतर सर्व विभागाच्या सह्या मिळतात. त्यामुळे आधीच बाहेरगावावरून येणाऱ्या व्यक्तीला हेलपाटे मारावे लागतात. आता फिटनेस प्रमाणपत्रासाठी ठराविक लोकच घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने दहा ते 15 दिवसांनंतरची तारीख दिली जात आहे. त्या दिवशी आल्यानंतर त्याला पुढचे सर्व सोपस्कार पार पाडावे लागतात. हे सर्व सोपस्कार होऊनही जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उपलब्धतेवर प्रमाणपत्र मिळण्याचा दिवस ठरतो. ते जाग्यावर नसतील तर, केवळ प्रमाणपत्र घेण्यासाठी पुन्हा हेलपाटा मारावा लागत आहे.

 मला तुमच्या मदतीची गरज आहे; तुम्ही लवकर टीम घेऊन या

रुग्णालयातील हेलपाट्याबरोबर आता खासगी दवाखान्यांतही रुग्णांना जावे लागत आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या फिजिशियन व मानसोपचार तज्ज्ञ नाही. फिजिशियनची ऑनकॉल नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खासगी "ओपीडी'मध्ये रुग्णांना जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातून दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी विशेष करून बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. 

ओळख असलेल्यांचे 200 रुपयांवर भागते ! 

शासकीय शुल्क भरून या विभागांच्या सह्यांसाठी नागरिकांना 400 रुपये मोजावे लागत आहेत. ओळख असलेल्या काहींचे 200 रुपयांवर भागते. परंतु, बहुतांश जणांना शासकीय शुल्काव्यतिरिक्त 400 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. नागरिकांची ही परवड थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
सातारा सातारा सातारा सातारा सातारा सातारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT