mla gopichand padalkar press conference in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री जयंत पाटील आणि आमदार पडळकर यांच्यात झाला वाद.... का ते वाचा...?

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील 35 गावांना बोटींची आवश्‍यकता आहे. सध्या 15 बोटी खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या 10-15 दिवसांत पूर आल्यास काय करणार असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित करीत जलसंपदा मंत्र्यासमोर नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत पूर आला तर काय नियोजन आहे, याचे उत्तर जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांना देता आले नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

जलसंपदा मंत्री व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर नियंत्रण आढावा बैठक झाली. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी बैठकीस उपस्थित होते. सभागृहात वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा सुरु असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपाययोजनाबाबत चर्चेस सुरवात केली. जिल्ह्यातील 35 गावांना बोटींची आवश्‍यकता आहे. सद्या 15 बोटी खरेदीसाठी निवीदा काढण्यात आली आहे. येत्या 10-15 दिवसांत पूर आल्यास काय करणार असा प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केला. यावरुन मंत्री जयंत पाटील व त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. 



आमदार पडळकर म्हणाले, गेल्यावर्षी बोटी नसल्याने ब्रम्हनाळ सारखी दुर्घटना घडली. सध्या पावसाचा जोर वाढला आहे. येत्या दहा- पंधरा दिवसात पूर आला तर काय करायचे असा प्रश्न मंत्री पाटील यांना विचारला असता, त्यांनी सभाच थांबवतो असे उत्तर दिले. निवीदा काढलेल्या बोटी कधी मिळणार याचे उत्तर त्यांच्याकडे नाही, त्या बोटींचे इंजिन जपानमधून येणार असल्याचे सांगतात. पण ते कधी येणार हे त्यांना माहित नाही. त्यामुळे आजची बैठक म्हणजे केवळ फार्स केला असल्याची टीकाही त्यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT