पश्चिम महाराष्ट्र

‘राज्य नियोजन’च्या अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती झाली. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या या पदामुळे कोल्हापूरचा पुन्हा एकदा सन्मान झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने किमान एका तरी आमदाराला संधी मिळेल, अशी आशा होती. आमदार क्षीरसागर व आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावांची चर्चा होती. काल (ता. १५) रात्री उशिरापर्यंत क्षीरसागर त्यांच्यासाठी गुड न्यूजच्या प्रतीक्षेत होते. मात्र, एकूण आमदारांच्या संख्येच्या तुलनेत मंत्र्यांची संख्या वाढल्याने आणखी एका पदाची निर्मिती करणे शक्‍य नव्हते.

क्षीरसागर यांच्या आमदारकीची दुसरी टर्म पाहता त्यांना शेवटच्या टप्प्यात किमान पद मिळेल, ही आशा होती. काल सायंकाळी त्यांना ‘मातोश्री’वर बोलावून राज्यमंत्रिपद देण्यात नेमकी काय अडचण आहे, याची माहिती देण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारात संधी नाही, हे काल रात्रीच स्पष्ट झाले 
होते.

आज सकाळी मात्र नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदावर संधी देण्यात आली  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची क्षीरसागर यांनी आज सकाळी भेट घेतली. सायंकाळी मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली. मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागात नियोजन विभाग महत्त्वाचा मानला जातो. जिल्हा स्तरावर नियोजन मंडळे आहेत. त्यांची शिखर संस्था म्हणून राज्य नियोजन मंडळ ओळखले जाते. नियोजन आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे राज्य तसेच जिल्हा पातळीवर पंचवार्षिक तसेच वार्षिक योजना तयार करणे हे मंडळाचे मुख्य काम आहे. वैधानिक विकास मंडळे, ग्रामीण रोजगार (रोजगार हमी योजना), डोंगराळ क्षेत्र विकास (पश्‍चिम घाट विकास कार्यक्रम), प्रादेशिक ग्रामीण बॅंकांना भागभांडवल असे कार्यक्रम नियोजन मंडळाच्या नियंत्रणाखाली राबविले जातात.

दरम्यान, क्षीरसागर यांचे मंगळवारी (ता. १९) सकाळी येथे आगमन होत आहे. त्यांच्या स्वागताची तयारी शहर शिवसेनेने केली आहे.

राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर संधी मिळाल्याने समाधानी असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की राज्यमंत्रिपद तरी मिळेल, अशी अशा होती. मात्र, आमदारांच्या संख्येच्या तुलनेत १५ टक्‍क्‍यांपर्यंत मंत्रिपदे निश्‍चित होत असल्याने आणखी एक पद निर्माण करणे कठीण होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आग्रही होते. त्यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मिलिंद नार्वेकर यांचे याकामी बहुमोल सहकार्य मिळाले.
- राजेश क्षीरसागर,
आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT