Vinay-Kore
Vinay-Kore 
पश्चिम महाराष्ट्र

विनय कोरेंच्या जनसुराज्यची 'शक्ती' भाजपला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - भारतीय जनता पार्टीचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्‍तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. कोरे हे पन्हाळा-शाहूवाडी मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे सत्यजित पाटील सरुडकर यांचा पराभव केला. कोरे यांच्या वारणा उदयोग समुहाला भाजपने मदत केली आहे. पुढेही कोरे यांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास पाहता त्यांना चांगली संधी मिळण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.

गेली दोन दशक कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात वारणा उदयोग समुहाच्या माध्यमातून कोरे यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. तत्कालिन कॉंग्रेसचे आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा पराभव करुन कोरे यांनी विधानसभेत एंट्री मारली. यानंतर स्वत:चाच जनसुराज्य शक्‍ती पक्ष स्थापन करत मंत्रीपदही मिळवले. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोरे यांना शिवसेनेचे सत्यजित पाटील यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवाने खचून न जाता कोरे यांनी पुन्हा राजकारणाचा श्रीगणेशा केला. भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून कोरे यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा धडक दिली. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद अशा सर्वच निवडणुकीत तालुक्‍यासह जिल्ह्यात त्यांनी आपले प्राबल्य व उपद्रवमुल्य दाखवून दिले. तर विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारत पुन्हा एकदा राजकीय क्षीतीजावर त्यांनी भरारी घेतली आहे.

कोरे यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव आणि अभ्यास मोठा आहे. तसेच भाजप असो किंवा शिवसेना यामध्ये सहकारात मुरलेल्या माणसांची कमतरता आहे. परिणामी कोरे यांचा अनुभव सहकारात उपयोगात आणला जाण्याची शक्‍यता असला तरी तुर्तास मोठ्या घडामोडी घडण्याची शक्‍यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. कोरे देखील काही काळ वारणा उद्योग समुहाची घडी ठिकठाक करण्याचे काम करतील, असे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. दरम्याम मंगळवारी कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT