Vishwajeet Kadam Vikram Sawant  esakal
पश्चिम महाराष्ट्र

विश्वजित कदम, विक्रम सावंत काँग्रेस सोडणार? दोन्ही आमदारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, जनतेला विश्वासात घेऊन..

राज्याचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानकपणे आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

'राज्याचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानकपणे आमदारकीचा राजीनामा दिला आहे. याच बातमीवरून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला वेदना झाल्या आहेत.'

सांगली : ‘‘माझ्याबद्दल माध्यमातून गैरसमज पसरवले जात आहेत. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. मतदार संघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेणार नाही,’’ अशी स्पष्टोक्ती कॉँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी समाजमाध्यमांवर चित्रफितीच्या माध्यमातून दिली.

काल (सोमवार) सकाळपासून वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली. राज्याचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानकपणे आमदारकीचा राजीनामा दिला आहे. याच बातमीवरून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला वेदना झाल्या आहेत. परंतु यासोबत मीसुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे, असा गैरसमज पसरवला जातोय. प्रथमत: मी माझ्या आमदारकीचा राजीनामा (Congress) दिलेला नाही. मी आजही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.

पलूस कडेगावच्या जनतेने दिवंगत पतंगराव कदम यांना प्रेम दिले, साथ दिली. त्याच माता भगिनींनी, ज्येष्ठांनी, तरुण कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगलीची आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली. म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये माझ्या पलुस कडेगावच्या बंधू-भगिनींना विश्वासात न घेता असे कोणतेही पाऊल टाकणार नाही, हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. कुणीही कुठलाही गैरसमज याठिकाणी करू नये. ही माझी विनंती आहे, असे त्यांनी समाज माध्यमात प्रसारित चित्रफितीत म्हटले आहे.

आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही - विक्रम सावंत

जत : आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. ज्या काही चर्चा सुरू आहेत. त्यावर कार्यकर्त्यांनी, जनतेने विश्वास ठेवू नये. २०१९ मध्ये मोदी लाटेतही मला काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि तालुक्याच्या विकासासाठी जनतेने निवडून दिले आहे. त्यांच्याशी प्रतारणा होणार नाही, अशी भूमिका जतचे आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT