Mobile and Internet service free for three months 
पश्चिम महाराष्ट्र

मोबाईल व इंटरनेट सेवा तीन महिने फ्री...कोणाचं काय अन ह्यांचं काय

सकाळ वृत्तसेवा

नगर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. हे जरी खरे असले तरी लोकांच्या हितासाठी सरकाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, आपली गैरसोय होत असल्याने रोज एकेक नेता आपापली मागणी पुढे रेटत आहे. त्यात काही मागण्या अजबच आहेत. अर्थात त्याही जनहिताच्याच आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "लॉक डाउन' असताना, अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी मोबाईल व इंटरनेट सेवा गरजेची असून, "लॉक डाउन'मुळे मोबाईल रिचार्ज करणे अवघड झाले आहे. त्यामुळे तीन महिने मोबाईल व इंटरनेट सेवा मोफत द्यावी, अशी मागणी लहूजी शक्ती सेनेचे कार्याध्यक्ष सुनील सकट यांनी केली आहे. 

दैनंदिन जीवनात मोबाईलदेखील गरजेची वस्तू बनली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत. नागरिकांवर काही आपत्ती ओढवल्यास किंवा मदतीची मागणी करण्यासाठी आणि इतरत्र असलेल्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईलची गरज भासत आहे.

मार्च महिना संपत असताना अनेकांच्या मोबाईलची सेवा खंडित होणार आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, इतरांना संपर्क साधणे अवघड होणार आहे. शासनाने अन्नधान्यासह आर्थिक मदत सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे मोबाईलची सेवा खंडित न करता पुढील तीन महिन्यांसाठी सेवा मोफत उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT