Mobile Found In Kalaba Jail  
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ! कळंबा कारागृहात सापडला मोबाईल

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बरॅकच्या मागील ड्रेनजमध्ये एक मोबाईल लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला आहे. तसे कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. याबाबत काल रात्री उशिरा अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे तत्कालीन कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची प्रशिक्षणाच्या नावाखाली नुकतीच तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या जागी दत्तात्रय गावडे यांची नियुक्ती झाली. त्यांनी कारागृहाच्या सुरक्षिततेला अग्रक्रम देणार असल्याचे पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्पष्ट केले होते. याचा भाग म्हणून कारागृह कर्मचाऱ्यांकडून काल सायंकाळी कारागृहाच्या झडती घेण्याचे काम सुरू होते. त्यावेळी त्यांना सर्कल क्रमांक पाच बरॅक क्रमांक दोनच्या पिछाडीस असणाऱ्या शौचालयाच्या ड्रेनेजमध्ये लपवून ठेवलेला मोबाईल हाती लागला. याची माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार कारागृहातील कर्मचारी वैभव रंगराव पाटील यांनी ही माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

त्यानुसार पोलिस ठाण्यात कारागृहाच्या सुरक्षिततेला धोका पोचविणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे करीत आहेत. 
ड्रेनजमध्ये लपवून ठेवलेला मोबाईल सापडल्याने कळंबा कारागृहाची सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी कारागृहात कैद्यांच्या पार्टीचे व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल झाले होते. वर्षभरापूर्वी न्यायालयीन बंदी संशयित संतोष पोळ याची कारागृहातील मोबाईलवरील क्‍लिप व्हायरल झाली होती. नुकतेच मोकाअंतर्गत कारवाई केलेल्या संशयितांना सवलत दिल्याच्या पोलिस प्रशासनाकडून दाखल झालेल्या तक्रारीची कारागृह प्रशासनाने दखल घेतली. त्यानुसार त्यांनी कारागृहातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, कारागृहात मोबाईल सापडला. 

पोलिसांसमोर आव्हान

कारागृहाची सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. त्यावर सीसीटीव्हीचा ‘वॉच’ आहे. प्रत्येकाला तपासून व खात्री करूनच कारागृहात सोडले जाते, तरीही मोबाईल कारागृहात कसा आला, त्याचा वापर कोण करीत होता, कोणाकोणाशी त्यावरून संपर्क साधण्यात आला अशा अनेक प्रश्‍नांचा तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांबरोबर कारागृह प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Uddhav Nimse : राहुल धोत्रे खून प्रकरण: २५ दिवसांनंतर उद्धव निमसे अखेर पोलिसांच्या ताब्यात

Sangli Fake IT Raid Case: 'स्पेशल 26' चित्रपटाप्रमाणे डॉक्टरच्या घरावर आयकर छापा, सोने व रोकड लंपास | Sakal News

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

SCROLL FOR NEXT