Mobile took the life of a young man 
पश्चिम महाराष्ट्र

video : मोबाईलने घेतला तरुणाचा जीव 

सकाळ वृत्तसेवा

नगर : शहरातील नगर-मनमाड रस्त्यावरील पत्रकार चौकात आज सिग्नल क्रॉस करून जाणाऱ्या दुचाकीवरील व्यापाऱ्याचा टॅंकरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. कमलेश अनिल पटवा (वय 27, रा. महालक्ष्मी उद्यानाजवळ, भुतकरवाडी, नगर) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कमलेश पटवा यांनी मोबाईलवर बोलत सिग्नल क्रॉस केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

शहरातील पत्रकार चौकात आज सकाळी सुरळीत सिग्नल सुरू होते. कमलेश पटवा यांचे मार्केट यार्डमध्ये हार्डवेअरचे दुकान आहे. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ते डीएसपी चौकाकडून सावेडीकडे निघाले होते. पत्रकार चौकात सिग्नल पडल्याने थांबले होते. त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईल डायल केला. सिग्नल सुरू होण्याअगोदर त्यांनी दुचाकी पुढे काढली. त्या वेळी दिल्ली गेटकडून येणाऱ्या टॅंकरच्या मध्यभागी त्यांची दुचाकी आदळली. त्यामुळे दुचाकी बाजूला पडली आणि कमशेल पटवा टॅंकरच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले.

त्यांच्या डोक्‍यावरून टॅंकरचे चाक गेल्याने मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. अपघात घडल्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळ थांबवून रुग्णवाहिका बोलविली आणि मृतदेह बाजूला काढला. व्यापारी कमलेश पटवा भुतकरवाडी येथील राहणारे असल्याने त्यांचे नातेवाईक-मित्र परिवाराने पत्रकार चौकात गर्दी केली होती. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

अपघात सीसीटीव्ही कैद 
डीएसपी चौकाकडून जाणाऱ्या वाहनांसाठी सिग्नल थांबाचा इशारा करीत होता. पटवा यांनी त्याकडे दुर्लक्ष करून दुचाकी पुढे काढली आणि अपघात झाला. हे दृश्‍य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. 

मोबाईलवर बोलू नका 
शहरामध्ये दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा सक्तीने वापर करणे आवश्‍यक आहे, तर दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलू नये. जेणेकरून अपघात टाळता येऊ शकतात. चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT