mom & son meet at last saperated due to lockdown
mom & son meet at last saperated due to lockdown 
पश्चिम महाराष्ट्र

अखेर मायलेकरांची झाली भेट... काय झाले?

सकाळवृत्तसेवा

ढालगाव : वनवासमाची (कराड) येथील सौ. लता यादव या आगळगांव (ता. कवठेमहांकाळ) येथे दोन महिन्यांपासून माहेरी अडकून पडल्या होत्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला. अखेर परवानगी मिळाली आणि लॉकडाउनमुळे ताटातुट झालेल्या मायलेकरांची भेट झाली. 

याविषयी माहिती अशी, की आगळगाव येथील दत्तात्रय आप्पासाहेब हुजरे यांची बहीण सौ. लता यादव घरगुती कार्यक्रमानिमित्त वनवासमाची (कराड) येथून माहेरी आगळगांव येथे आल्या होत्या. दरम्यान, मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रसारामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने आगळगांव येथे माहेरी दोन महिन्यापासून अडकल्या होत्या.

मात्र दोन महिने झाले. दोन्ही मुले वनवासमाची (कराड) येथे घरी राहिली. जिल्हा बंदी असल्याने सौ. यादव वनवासमाची येथे जाऊ शकल्या नाहीत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करण्यात आला. त्यांच्या अर्जाची दखल घेतली जात नव्हती. परवानगी नाकारलीही जात नव्हती. दिलीही जात नव्हती. सौ. यादव कात्रीत सापडल्या होत्या.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी आगळगांव येथील सागर शेटे यांनी संपर्क साधत लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात यंत्रणा हलली आणि परवानागी देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT