The money found was returned 
पश्चिम महाराष्ट्र

सापडलेले अडीच लाख केले परत

सकाळ वृत्तसेवा

नेवासे(नगर) : शनिभक्ताचे सापडलेले अडीच लाख रुपये परत करून मुळा एज्युकेशन सोसायटीच्या दोन सुरक्षारक्षकांनी प्रामाणिकपणाचे अनोखे दर्शन घडविले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व युवा नेते प्रशांत गडाख यांनी या दोघांचा प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरव केला. 

"मुळा एज्युकेशन'च्या सोनई शैक्षणिक संकुलातील राम मुक्ताजी कोकरे व अनिल साहेबराव सकट हे दोन सुरक्षारक्षक शनिवारी (ता. 7) सायंकाळी सहाच्या सुमारास शनिशिंगणापूर येथे शनिदर्शनास गेले होते. त्यांना शनी चौथऱ्याजवळ रोख अडीच लाख रुपये असलेली बॅग सापडली. या दोघांनीही समयसूचकता दाखवत ताबडतोब ही बॅग शनिशिंगणापूर पोलिसांच्या चेकपोस्टवर जमा करून खबर दिली. पोलिसांनी देवस्थानच्या ध्वनिवर्धकावरून याबाबत घोषणा केली. त्यास प्रतिसाद मिळून नरेंद्र अण्णाजी डांगरे (रा. रामटेक, नागपूर) या शनिभक्ताने त्यावर दावा सांगितला. पोलिसांनी खात्री करून ओळख पटल्यानंतर बॅग डांगरे यांच्या स्वाधीन केली.

एवढी मोठी रक्कम हरवल्यानंतरही सुखरूप परत मिळाल्याने हरखून गेलेल्या डांगरे यांनी कोकरे व सकट यांची भेट घेऊन आभार मानले. डांगरे यांनी या दोघांची व ते कामाला असलेल्या संस्थेची आस्थेने चौकशी केली. साधारण आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांच्यातील प्रामाणिकपणा भावल्याने डांगरे यांनी कोकरे व सकट यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देऊ केली. मात्र, या दोघांनीही आपण कर्तव्य केल्याचे सांगून आमच्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख आणि युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांचे संस्कार असल्याचे स्पष्ट केले आणि डांगरे देत असलेली रोख रक्कम नम्रपणे नाकारली. त्यांच्यातील स्वाभिमान पाहून डांगरे यांच्यासह उपस्थित पोलिस अधिकारी-कर्मचारी व शनिभक्त भारावून गेले. 

या घटनेची जोरदार चर्चा सोशल मीडियावरून झाली. "मुळा एज्युकेशन'चे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांना आपल्या संस्थेतील सुरक्षारक्षकांच्या प्रामाणिकपणाचा किस्सा समजल्याने त्यांनी कोकरे व सकट यांना बोलावून घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. गडाख यांनी या दोघांनाही प्रत्येकी रोख पाच हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला. 

शाबासकीची थाप
मुळा एज्युकेशन सोसायटीच्या दोन सुरक्षारक्षकांना दिलेले बक्षीस म्हणजे माझ्या परिवारातील सदस्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक आणि शाबासकीची थाप आहे. 
- प्रशांत पाटील गडाख, अध्यक्ष, मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Maratha Reservation Protest: जेवळीतील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन; उपोषण स्थगित तरी मराठा आरक्षणासाठी लढा कायम

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

SCROLL FOR NEXT