The money will be directly credited to the farmers account 
पश्चिम महाराष्ट्र

"तो' निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार वर्ग

सकाळ वृत्तसेवा

 नगर ः ""जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी सरकारकडून प्रशासनास प्राप्त झाला. तहसील पातळीवर हा निधी आज वर्ग करण्यात आला. लवकरात-लवकर हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे,'' अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली. 

मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनातर्फे जिरायती, बागायती आणि फळबागा मिळून चार लाख 54 हजार हेक्‍टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. फटका बसलेल्या शेतकऱ्यांची संख्या सहा लाख 36 हजार 146 आहे.

जिल्ह्यातील नुकसानीचा हा अहवाल विभागीय आयुक्तांतर्फे शासनदरबारी दाखल झाला होता. आता नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून 135 कोटी 55 लाख रुपयांचे अनुदान नुकतेच जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले होते. या मदतीचे वाटप तत्काळ तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. 

गेल्या वर्षी जिल्ह्याने दुष्काळ सोसला. पशुधन जगविण्यासाठी 504 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या टॅंकरच्या संख्येने 873 इतका विक्रमी आकडा गाठला.

यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीला शिवाराचे डोळे मॉन्सूनच्या आगमनावर लागले होते. सुरवातीची काही नक्षत्रे बरसल्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस चित्रा व स्वाती नक्षत्राच्या सरींनी शिवारात बरसातीचा उत्सव मांडला. 97 पैकी 97 महसूल मंडळांत दमदार पाऊस झाला. परतीच्या मॉन्सूनने यंदा 809.99 मिलिमीटर पावसाने मागील 18 वर्षांच्या सरासरीचा विक्रम मोडला. ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात 200 मिलिमीटर उच्चांकी पाऊस झाला. 
पावसाने खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पावसामुळे घटलेला जलस्तर वाढला आहे. मात्र, बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, कपाशी, फळबागा आदी पिकांचे फड उद्‌ध्वस्त केले. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राज्य शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार 135 कोटी 55 लाख पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. उर्वरित 339 कोटींचा निधी मिळणे अपेक्षित आहे. 

तालुकानिहाय वाटप अनुदान (रुपये लाखांत) 
नगर-945.04 
पारनेर-807.89 
पाथर्डी-1946.05 
कर्जत-687.54 
श्रीगोंदे-857.54 
जामखेड-169.81 
श्रीरामपूर- 793.63 
नेवासे-1098.97 
शेवगाव-1461.19 
राहुरी-779.35 
संगमनेर-1025.54 
अकोले-1498.25 
कोपरगाव-828.02 
राहाता-656.19 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT