Monsoon Update Chatak Bird esakal
पश्चिम महाराष्ट्र

Monsoon Update : राज्यात जोरदार पाऊस बरसणार; 'हा' पक्षी थेट आफ्रिकेतून आला सांगावा घेऊन..

काळ्या-पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर एखाद्या राजकुमाराच्या डोक्यावर शोभावा असा काळा तुरा असतो.

सकाळ डिजिटल टीम

चातकाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे.

अंकलखोप : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस (Monsoon) येणार असल्याची वर्दी पक्ष्यांकडून मिळते. ‘कुळीव, कुळीव’ म्हणणारी कोकिळा, ‘पेरते व्हा,’ अशी साद घालणारा पावशा, हे नेहमीच पावसाच्या आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना सज्ज ठेवत असतात.

तसाच आणखी एक पाहुणा उशिरा का होईना थेट आफ्रिकेतून (Africa) पावसाचा सांगावा घेऊन कृष्णा नदीकाठावर दाखल झाला. काळ्या-पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर एखाद्या राजकुमाराच्या डोक्यावर शोभावा असा काळा तुरा असतो. त्याचा साळुंकीएवढा आकार, लांब शेपूट, शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा असतो.

हनुवटी, मान व पोटाचा भाग पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा पक्षी सहज ओळखता येतो. शेपटीतील पिसांची टोके पांढरी असतात. डोळे तांबडे तपकिरी, चोच काळी व पाय काळसर निळे असतात. ते एकेकटे किंवा यांची जोडी असते. चातक (Chatak Bird) सध्या पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठी दाखल झाला आहे.

कोकिळा, पावशा, कारुण्य कोकिळा, बुलबुल, रॉबीन या गाणाऱ्या पक्ष्यांसमवेत चातकाच्या सुरांची रानमैफल ‘कृष्णा’काठावर रंगत आहे. आमणापूर येथील नागोबा कट्टा परिसरात काल (रविवारी) दोन चातक पाहायला मिळाल्याची माहिती पक्षिप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली. चातकाची विण जूनपासून ऑगस्टपर्यंत होते. मीलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात. कोकिळेप्रमाणे याही पक्ष्यात भ्रूण परजीविता दिसून येते.

मादी आपली अंडी छोट्या सातभाईच्या घरट्यात घालते. सातभाई हा लहान पक्षी असल्यामुळे भिऊन घरट्यातून पळून जातो. काही आडकाठी न येता तिला सातभाईच्या घरट्यात अंडी घालता येतात. अंड्याचा रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणेच आकाशी असतो. सप्टेंबरच्या सुमारास सातभाईची पिले अंड्यांतून बाहेर येतात. त्यातच चातकाचे पिल्लू असते. चातकाचे पिल्लू तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखांवर पिवळसर आडवा पट्टा असतो.

मुक्काम जून ते सप्टेंबर

चातकाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे. २०१९ ला १ जून, २०२० ला ५ जून, २०२१ ला १५ मे, २०२२ ला १३ जून तर यंदा उशिरा का होईना ११ जूनला चातक पक्ष्याची नोंद कृष्णा नदीकाठावर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT