Jamboti-Chorla Route esakal
पश्चिम महाराष्ट्र

गोव्याला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' घाटातील अवजड वाहतुकीवर बंदी, चारचाकी वाहनांना मुभा?

जांबोटी-चोर्ला मार्गावर (Jamboti-Chorla Route) संततधार पावसामुळे वाहतुकीत व्यत्यय येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

चोर्लामार्गे गोव्याकडे जाण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता बंद असल्याची माहिती देऊन खानापूर येथून अनमोडमार्गे गोव्याकडे वळविले जात आहे.

बेळगाव : जांबोटी-चोर्ला मार्गावर (Jamboti-Chorla Route) संततधार पावसामुळे वाहतुकीत व्यत्यय येत आहे. येथील नदी-नाल्यांवर असलेले पूल जीर्ण झाले असल्याने बेळगावातून जांबोटी-चोर्लामार्गे गोव्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना खानापूरमार्गे वळविण्यात आले आहे, तर चोर्ला घाटातील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

केवळ चारचाकी वाहनांना चोर्लामार्गे गोव्याकडे (Goa) जाण्याची परवानगी देण्यात आली असून, सहाचाकी आणि त्यापुढील वाहनांना चोर्लाऐवजी अनमोड घाटमार्गे जाण्याची सूचना केली आहे. चोर्ला मार्गावरून गोव्यात दूध, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या सहाचाकी वाहनांवरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

चोर्ला मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्यानंतर बेळगाव शहर पोलिसांनी पिरनवाडी येथे बॅरिकेड्‍स उभारले आहेत. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, अवजड वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव केला जात आहे.

चोर्लामार्गे गोव्याकडे जाण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना रस्ता बंद असल्याची माहिती देऊन खानापूर येथून अनमोडमार्गे गोव्याकडे वळविले जात आहे. एकही अवजड वाहन चोर्लामार्गे गोव्याकडे पाठविले जाऊ नये, अशी सक्त सूचना करण्यात आली आहे. चोर्ला मार्ग बंद करण्यात आला असल्याने केवळ जांबोटीपर्यंत सर्व वाहने जात असून, वाहनांची चौकशी करूनच पुढे वाहने सोडली जात आहेत. यामुळे अनमोड मार्गावरील वाहतूकही वाढली आहे.

अनमोड घाटात कोंडी शक्य

अनमोड मार्गावर खानापूर ते रामनगर रस्ता खराब असल्याने वाहतूक समस्या निर्माण होत आहे. चोर्ला मार्गावरील सर्व वाहतूक अनमोडमार्गे वळविल्यास वाहतूक कोंडीची समस्यादेखील निर्माण होऊ शकते. या ठिकाणीदेखील पोलिस लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बातम्या पेरून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेला, आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्याबद्दल खोटं पसरवतोय; धंगेकरांची आणखी एक पोस्ट

IND vs AUS, 2nd ODI: भारतीय संघाने सलग १७ वा टॉस हरला; प्लेइंग-11 मध्ये कुलदीपला संधी नाहीच, जाणून घ्या कसे आहेत दोन्ही संघ

रितेश जेनिलियाची यंदाची दिवाळी लातूरमध्ये नाहीतर मुंबईत, नवऱ्याने मुलासोबत स्वत: केल बायकोचं औक्षण

Panchang 24 October 2025: दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

Miscarriage Causes: सतत गर्भपात का होतो? मग डॉक्टरांकडून जाणून घ्या याची कारणे, लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT