Most of the reports are negative: relief to the Bagani villege 
पश्चिम महाराष्ट्र

बहुतांश अहवाल निगेटीव्ह : कासेगाव, कामेरी आणि बावचीरांना दिलासा

सकाळवृत्तसेवा

बागणी : तालुक्‍यातील कासेगाव, कामेरी आणि बावची येथील संशयित बहुतांश रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने भागातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मात्र धोका अजूनही टळलेला नाही, नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन बागणी (ता. वाळवा) येथील प्रथम वैद्यकीय अधिकारी प्रियंका राजमाने यांनी केले आहे. 

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील बावची येथील व्यक्ती आढळल्याने बागणी आरोग्य केंद्राबरोबर उपकेद्रांमध्ये येणारी शिगाव, ढवळी, कोरेगाव, भडकंबे, रोझावाडी, काकाचीवाडी, फाळकेवाडी या गावांतही नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. सतर्कतेसाठी स्थानिक प्रशासनाने गावात तीन दिवस लॉकडाऊन घोषित करून नागरिकांची काळजी घेण्यात आली.

बावचीतील त्या संशयित रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे समजताच नागरिकांच्यात कोरोना विषयांचे गांभीर्य निघत असल्याचे चित्र भागात दिसत असल्याने भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांना अहवान करून जनजागृती करीत आहे. 

सध्या बागणी सह उपकेद्रांमध्ये मुंबई-पुणे व इतर जिल्ह्यातून सुमारे 960 हून अधिक लोक भागात दाखल झाले आहेत. त्यातील बहुतांशी लोकांचा होमक्वारंटाईन कालावधी संपला आहे. काहींचा होमक्वारंटाईन कालावधी शिल्लक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असून बाहेरील जिल्ह्यातून तसेच पुणे-मुंबई येथून छुप्या मार्गाने गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तिची माहिती ओरोग्य केंद्रात देणे प्रत्येक कुटुंबाला बंधनकारक करण्यात आले आहे. याबरोबरच भागात कोरोना बचावासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करण्यास सक्ती करण्यात आली आहे. 

नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे

आरोग्य विभाग सर्वत्र लक्ष ठेऊन आहे. त्याचबरोबर आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आपल्या सुरक्षेसाठी झटत असून त्यांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
- प्रियंका राजमाने, प्रथम वैद्यकीय अधिकारी, बागणी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT